महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अटल सेतूवरुन उडी मारुन बँकरनं संपवलं जीवन ; कामाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप - Pune Banker Commits Suicide - PUNE BANKER COMMITS SUICIDE

Pune Banker Commits Suicide : पुण्याच्या बँकर तरुणानं मुंबईत झालेल्या बैठकीनंतर अटल सेतूवरुन समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी नाव्हा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या तरुणाच्या कुटुंबीयांनी कामाच्या तणावातून तरुणानं आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे.

Pune Banker Commits Suicide
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2024, 10:19 AM IST

नवी मुंबई Pune Banker Commits Suicide : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरुन आत्महत्या करण्याचं सत्र दिवसागणिक वाढत आहे. नुकतंच न्हावा शेवा पोलिसांनी एका महिलेला अटल सेतुवरुन आत्महत्या करत असताना वाचवल्याची घटना ताजी आहे. त्यातच आता पुन्हा एकदा पिंपरीच्या बँकरनं अटल सेतूवरुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र या बँकरनं कामाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. अ‍ॅलेक्स रेगी असं अटल सेतूवरुन आत्महत्या करणाऱ्या बँकरचं नाव आहे.

काय आहे प्रकरण :अ‍ॅलेक्स रेगी (35) हा तरुण पुण्यातील पिंपरी इथं राहणारा होता. तो पुण्यातील एका बँकेत कार्यरत होता. कामाच्या बैठकीसाठी अ‍ॅलेक्स रेगी हा पिंपरीहुन मुंबईत आला होता. त्यानं मुंबईतील चेंबूर इथं राहणाऱ्या त्याच्या सासऱ्याचीही भेट घेतली. त्यानंतर पिंपरी इथल्या घरी निघत असताना त्यानं अटल सेतूवरून उडी मारुन आत्महत्या केली.

अटल सेतुवर गाडी थांबल्यानं उघडकीस आली घटना :अटल सेतू मार्गे आपल्या घरी पिंपरी इथं जात असतानाच अ‍ॅलेक्स यानं अटल सेतूवर त्याची कार थांबवली. सीसीटीव्हीमध्ये कार थांबल्याचं पाहून यंत्रणेनं पोलिसांना सूचना दिली. परंतू, पोलीस पोहोचेपर्यंत अ‍ॅलेक्सनं समुद्रात उडी मारली होती. त्यानं कामाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयानं केला आहे. बचाव पथकानं बँकर अ‍ॅलेक्स रेगी याचा मृतदेह शोधला आणि कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. वरिष्ठांनी त्याच्यावर कामाचा दबाव टाकल्यानं त्यानं आत्महत्या केली, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. याप्रकरणी न्हावा शेवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

  1. तरुणानं लॉजवर नेऊन केला बलात्कार, हादरलेल्या पीडितेनं संपवलं जीवन; तर दुसऱ्या घटनेत नराधमानं दिव्यांग महिलेला केलं 'वासनेची शिकार' - Rape Victim Girl Commits Suicide
  2. बंदाघाटावर महिलेला बोलावलं भेटायला, मग भल्या पहाटे चाकूनं भोसकलं; विवाहितेचा खून करुन तरुणाची आत्महत्या - Man Killed Women
  3. सासरच्या जाचाला कंटाळून डॉक्टर तरुणीची आत्महत्या; रशियात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पतीला ठोकल्या बेड्या - Doctor Girl Suicide Case

ABOUT THE AUTHOR

...view details