मुंबईPrakash Ambedkar On Ujjwal Nikam: 26/11 खटल्यातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी, कोणत्यातरी धार्मिक संघटनेला वाचवण्यासाठी, तसंच कोणत्यातरी व्यक्तीला वाचवण्यासाठी त्याकाळी आपल्यावर दबाव असेल तर ते स्पष्ट करावं, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांना केलंय. आता आपण लोकसभेचे उमेदवार आहात आता कोणताही दबाव नाही. प्रामाणिकपणे निकम यांनी सांगावं की, त्यांच्यावर कोणी दबाव आणला होता का? की, करकरे, साळसकर, कामटे आणि पाच पोलीस कर्मचारी यांच्या संदर्भातले पुरावे लीक करू नका अशा कोणी सूचना दिल्या होत्या?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केलाय.
26/11 मध्ये काय घडलं आहे? : अँड. उज्वल निकम यांनी 26/11 च्या खटल्यात काही दबाव होता का? हे स्पष्ट करावं असं आवाहन करताना ॲड. आंबेडकर म्हणाले की, जसं परकियांकडून देशाच्या एकतेला धोका आहे, तसंच बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील शेवटच्या भाषणात म्हटलं आहे की, या देशात जयचंद किती निर्माण झाले आणि या भारताला स्वतंत्र अस्तित्व गमवावं लागलं त्याची उदाहरणे त्यांनी दिली आहेत. मी उज्ज्वल निकम यांना आवाहन करतोय की, 26/11 मध्ये काय घडलं आहे? हे लोकांना प्रामाणिकपणं सांगावं. आपण सांगितलेली व्यक्ती आणि संघटना या देशात जयचंदचे काम करणार का? याबद्दल जनता निर्णय घेईल.