महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंना पुन्हा बसणार धक्का ; निवडणूक आयोग पुढील आठवड्यात 'या' प्रकरणी कारवाई करण्याची शक्यता - Uddhav Thackeray In Trouble

Uddhav Thackeray In Trouble : लोकसभा निवडणूक 2024 च्या मतदानाच्या दिवशी उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या प्रकरणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडं केली. या प्रकरणी पुढील आठवड्यात निवडणूक आयोग कारवाई करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Uddhav Thackeray In Trouble
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 2, 2024, 10:50 AM IST

मुंबई Uddhav Thackeray In Trouble : उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना "राजकारणात एक तर मी राहील किंवा एक तर तू राहशील," असं आव्हान दिलं होतं. यानंतर यावर सत्ताधारी-विरोधकांकडून प्रतिक्रिया उमटत असताना, आता उद्धव ठाकरेंसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणूक 2024 मतदानाच्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरुन त्यांच्यावर कारवाईचा निर्णय पुढील आठवड्यात येणार आहे. आमदार आशिष शेलार यांनी या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडं तक्रार दाखल केली होती.

नेमकं काय आहे प्रकरण ? :मुंबईसह, उपनगर आणि ठाणे लोकसभा निवडणुकीचं मतदान 20 मे 2024 रोजी पार पडलं. यावेळी मुंबईतील बऱ्याच मतदान केंद्रावर अतिशय संथगतीनं मतदान सुरू असल्याच्या तक्रारी आल्या. काही मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड, वीज गायब, पाण्याची सोय नाही, आदी प्रकार घडले. यावरून उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. तसेच ज्या मतदान केंद्रावर संथगतीनं मतदान सुरू आहे, त्या ठिकाणी मतदानाची वेळ वाढवून निवडणूक आयोगानं द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. मात्र मतदान सुरू असताना पत्रकार परिषद कशी घेऊ शकता? पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी आचारसंहितेचा भंग केला आहे, असा दावा भाजपा नेते अशिष शेलार यांनी करत केंद्रीय निवडणूक आयोगाकडं तक्रार केली.

केंद्रीय निवडणूक आयोगानं मागवला अहवाल :आमदार आशिष शेलार यांच्या तक्रारीनंतर याची गंभीर दखल केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतली. या प्रकरणी 20 मे रोजी मुंबईतील काही मतदान केंद्रावर नेमकी परिस्थिती काय होती? नेमकं काय घडलं? याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला दिले. राज्य निवडणूक आयोगानं काही दिवसांपूर्वी 20 मे रोजीचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडं सादर केला. या अहवालानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर आले आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून त्यांच्यावर कारवाईबाबत पुढील आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या समोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत काय निर्णय येतो? आणि कारवाई काय होते? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

  1. विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा दिलासा; निवडणूक आयोगानं घेतला मोठा निर्णय - Shivsena UBT
  2. 'आमचा पक्ष शिवसेनाच' : निवडणूक आयोगाकडं आम्ही जमा खर्च कशाचा सादर करावा? - Uddhav Thackeray
  3. निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपाती? विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर निवडणूक आयोग आणि ठाकरे गटात संघर्ष वाढण्याची शक्यता - Shivsena UBT vs EC

ABOUT THE AUTHOR

...view details