महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्रात जनतेला राजकीय परिवर्तन हवंय - शरद पवार - Sharad Pawar on assembly elections - SHARAD PAWAR ON ASSEMBLY ELECTIONS

Sharad Pawar on assembly elections : आगामी विधानसभा निवडणुकांबाबत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय. राज्यात जनतेला आता परिवर्तव हवं असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी जनमताची अपेक्षा केलीय.

Sharad Pawar
शरद पवार (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 21, 2024, 9:42 PM IST

मुंबई Sharad Pawar on assembly elections:विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष निवडणुकीची तयारी करत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये इनकमिंग-आउटगोइंग सुरू असताना महाविकास आघाडी आणि महायुतीकडून संघटन मजबूत करण्यासाठी राज्यभर मेळावे घेण्यावर भर दिला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

शरद पवार यांची पत्रकार परिषद (ETV BHARAT Reporter)




जनतेला आता बदल हवाय : आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात टक्कर पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वांचाच आपला पक्ष मजबूत करण्यावर भर आहे. "राज्यातील जनतेला आता बदल हवा आहे," असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.



देशात वेगळेच वातावरण :"विधानसभा निवडणुका दीड ते दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षानं देशात वेगळेच वातावरण निर्माण केलं होतं. त्यामुळं त्यांनी 400 हून अधिक जागा मिळतील, असा दावा केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जनतेचा कौल स्पष्ट झाला आहे. केंद्रात मोदी सरकार स्थापन झालं. मात्र त्यांना दोन पक्षांच्या पाठिंब्यावर बहुमत सिद्ध करावं लागलं," याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधलं.


जनमताची अपेक्षा आहे :" लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 31 जागांवर जनतेनं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केलंय. जनतेला परिवर्तन हवं आहे, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झालं आहे. त्यामुळं या पुढंदेखील जनमताची अपेक्षा आहे. जनतेला बदल हवा आहे, तेच सध्याचं चित्र आहे," असे शरद पवार यांनी म्हटलं आहे. "एखादी घटना घडली, तर जनतेतून किती तीव्र प्रतिक्रिया उमटतात. हे बदलापूर प्रकरणावरून दिसून येतं," अशी प्रतिक्रिया त्यांनी बदलापूर प्रकरणावर दिलीय.

'हे' वाचलंत का :

  1. राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी "एक अनार, सौ बिमार" अशी अवस्था - Vidhansabha Election 2024
  2. महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र, देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची घेतली भेट - Maharashtra politics
  3. "यांच्याकडे आपण लक्ष देत नाही...", शिंदेंच्या आमदाराला अजित पवारांनी एका वाक्यात दिलं उत्तर - Ajit Pawar On Mahendra Thorve

ABOUT THE AUTHOR

...view details