मुंबई Patra Chawl Scam Case :शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीला पत्र लिहिलं आहे. पत्राचाळ प्रकरणी पोलिसांना दिलेला जबाब बदलण्यासाठी संजय राऊत दबाव टाकत असल्याचा स्वप्ना पाटकर यांनी आरोप केला.आपल्या जीवाला धोका असल्याचं देखील त्यांनी पत्रात म्हटलंय. स्वप्ना पाटकर यांच्या आरोपानंतर आता पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
स्वप्ना पाटकर यांचा नेमका आरोप काय? :स्वप्ना पाटकर यांनी पत्रात संजय राऊत यांचं नाव स्पष्टपणे घेतलं आहे. ईडीच्या पश्चिम विभागाच्या अतिरिक्त संचालकांना हे पत्र लिहिलं त्यांनी लिहिलं आहे. ज्यामध्ये असं म्हटलं आहे की, "पत्राचाळ प्रकरणातील आरोपी आणि त्यांचे गुंड मला सतत धमकावत आहेत. माझ्यावर बलात्कार केला जाईल, अशीही धमकी दिली जात आहे. इतर साक्षीदारांनाही अशाच प्रकारे धमक्या दिल्या जाण्याची शक्यता आहे. माझा जबाब बदलण्यासाठी माझ्यावर दबाव निर्माण केला जात असून, या प्रकरणातील आरोपी संजय राऊत आणि त्याच्या कुटुंबीयांवर नोंदवलेले आरोप बदलण्यासाठी हा दबाव निर्माण केला जात आहे."