विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद (Reporter Etv Bharat Maharashtra) कोल्हापूर Vijay Wadettiwar : मुंबईत 2008 साली झालेल्या 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे (Hemant Karkare) यांच्या अंगात घुसलेली गोळी दहशतवाद्यांची नव्हती, असं धक्कादायक वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय. हेमंत करकरे यांच्या अंगात घुसलेली गोळी दहशतवाद्यांची नव्हती, असं एस.एम. मुश्रीफ यांनी लिहिलेल्या पुस्तकात म्हटलं आहे. त्यांनी लिहिलेलं खर असेल तर, हा देशद्रोहाचा प्रकार आहे, असं मी म्हणालो, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. कसाबला फाशीची शिक्षा देण्याचं काम तालुका पातळीवरील वकिलांनीही केलं असतं, कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी उज्ज्वल निकम यांची प्रवृत्ती ओळखली होती, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. ते रविवारी कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
आमच्या घराची खिडकी भाजपानं काढली :पुढं बोलताना ते म्हणाले, "भाजपानं घरं फोडली, पक्ष फोडले, आमच्या घराच्या देखील काही खिडक्या घेऊन गेले. नांदेडची खिडकी भाजपानं काढून नेली, पण आमचं घर शाबूत आहे, सुशोभित आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज निवडून आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील 'एम' फॅक्टर हद्दपार होईल," असा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर केला.
आरक्षणाची मर्यादा 73 टक्के वाढवणार : "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाची मर्यादा 73 टक्के वाढवणार असल्याचं म्हटलं आहे. जो समाज आरक्षणापासून वंचित आहे, त्यांना सत्तेत आल्यावर न्याय देऊ. कायद्याला धरून हे आरक्षण दिलं जाईल. देशाच्या पंतप्रधानपदी मोदी आल्यानंतर किती दहशतवादी हल्ले झाले, ते पाहा. 2019 साली पुलवामा झाला. इतके हल्ले होऊन भाजपावाले खोटं कसं बोलतात?" असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी विचारलाय. ते पुढे म्हणाले की, "शरद पवार यांच्यावर बोलताना सांभाळून बोललं पाहिजे. ते एक ज्येष्ठ नेते आहेत, मध्य प्रदेशातील जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केल्यानंतर दोनच दिवसात अजित पवार भाजपासोबत गेले. 'बेटा अजित अपने 70 हजार करोड खाया है! अभी ये चाबी लेलो और खा लो' असा संदेशच केंद्रातील मोदी सरकारनं दिल्यामुळं भ्रष्टाचारावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही."
जिल्ह्यातील 'एम' फॅक्टर हद्दपार होणार : "कोल्हापूर लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती पाच लाखांच्या मतांनी निवडून येतील," असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय. शाहू महाराजांच्या विजयानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील 'एम' फॅक्टर जिल्ह्यातून हद्दपार होतील. कारण पक्षाशी गद्दारी कोल्हापूरच्या जनतेला मान्य नाही," असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.
हे वाचलंत का :
- "पक्ष चिन्हासारखं आमचं ग्राउंडही चोरीला गेलं, पण जनतेने निवडणूक...", रोहित पवारांचा अजित पवार गटावर हल्लाबोल - Lok Sabha Election 2024
- ईशान्य मुंबईत संजय पाटील नावाचे 4 डमी उमेदवार, मतदारांना संभ्रमित करण्याचं हे षडयंत्र असल्याचा संजय पाटील यांचा आरोप - North East Mumbai Lok Sabha
- प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांची शरद पवारांवर कुरघोडी, ५० वर्षानंतर पहिल्यांदाच बदलावी लागली 'ही' गोष्ट - Baramati lok Saba election 2024