महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

श्रीरामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार - Sai Sansthan Shirdi - SAI SANSTHAN SHIRDI

SriRam Navami Shirdi : साईबाबांच्या शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या श्रीरामनवमी उत्सवाची साई संस्थानच्यावतीनं जय्यत तयारी करण्यात आलीय. उत्सवाच्या मुख्य दिवशी 17 एप्रिल रोजी साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात आले असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.

SriRam Navami Shirdi
शिर्डी

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 12, 2024, 8:12 PM IST

रामनवमीच्या स्वागतासाठी शिर्डीची सजावट सुरू

शिर्डी (अहमदनगर)SriRam Navami Shirdi : शिर्डी साईबाबा संस्थानच्यावतीनं 16 ते 18 एप्रिल असा तीन दिवसीय श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी 113वा श्रीरामनवमी उत्सव असल्यानं लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी या तीन दिवसात येणार आहे. या उत्सवासाठी देश-विदेशातून लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येणार आहे. त्याच बरोबर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शेकडो पायी पालख्या श्रीरामनवमी उत्सवासाठी शिर्डीत दाखल होणार असल्यानं या सर्व भाविकांची राहण्याची, जेवणाची तसेच कडक्याचा उन्हाळा असल्यानं ठिकठिकाणी मंडप व्यवस्था तसेच पिण्याचा पाण्याची व्यवस्था साईबाबा संस्थानच्यावतीनं करण्यात आली आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी ही माहिती दिली.

साईभक्तांच्या पालख्यांची शिर्डीत हजेरी :शिर्डी साईबाबा संस्‍थानकडून दरवर्षी श्रीरामनवमी उत्‍सव साजरा करण्यात येतो. तीन मुख्‍य उत्‍सवांपैकी हा एक उत्‍सव आहे. हा उत्‍सव तीन दिवस साजरा केला जातो. या उत्‍सवाला शतकाची परंपरा असून साक्षात साईबाबांच्‍या आज्ञेने हा उत्‍सव सुरू झाला आहे. त्‍यामुळे त्‍यास अनन्‍यसाधारण महत्त्‍व आहे. साईबाबा संस्‍थान एखाद्या मोठ्या सणासारखा हा उत्‍सव साजरा करतो. दरवर्षी श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या निमित्तानं देशाच्‍या कानाकोपऱ्यातून सुमारे २५० ते ३०० पालख्‍या घेऊन हजारो पदयात्री साईभक्‍त साईनामाच्‍या गजरात शिर्डीस हजेरी लावतात. साईबाबा संस्‍थान आयोजित श्रीरामनवमी, गुरुपौर्णिमा आणि पुण्‍यतिथी या तीन उत्‍सवाच्‍या व्‍यतिरिक्‍त संपूर्ण वर्षभर साईभक्‍त साईबाबांच्‍या या पालखीत साईंची प्रतिमा घेऊन मजल दर मजल करीत शिर्डीला पोहचतात.

वर्षभरात 500 पालख्यांचे शिर्डीत आगमन :पहिल्‍या पालखीचा मान साईभक्‍त बाबासाहे‍ब शिंदे यांच्‍या मार्गदर्शनाखाली १९८१ साली सुरू होऊन साईनिकेतन दादर, मुंबई या ठिकाणाहून ४३ भक्‍तांसह शिर्डीला निघालेल्‍या “साईसेवक मंडळाच्‍या” पालखीचा आहे. एकट्या मुंबई आणि उपनगरातून दरवर्षी श्रीरामनवमी उत्‍सवाला सुमारे १०० ते १५० पालख्‍या शिर्डीस येत असून वर्षभरात सुमारे ५०० पालख्‍या शिर्डीस येतात. याशिवाय गेली ३५ वर्षांपासून प्रत्‍येक गुरुपौर्णिमा उत्‍सवाला साईबाबा पालखी सोहळा समिती पुणे ही पालखी शिर्डीस येत आहे. संपूर्ण वर्षभर महाराष्‍ट्रासह गुजरात, गोवा, मध्‍यप्रदेश, आंध्रप्रदेश आदी राज्‍यांमधून मोठ्या संख्‍येने पालख्‍या शिर्डीत येतात. अशाप्रकारे गेल्‍या काही वर्षांपासून साईंची पालखी घेऊन येणारे साईभक्‍त पदयात्री हे या श्रीरामनवमी उत्‍सवाचे आकर्षण ठरत आहे.

'या' साईभक्तांनी केली मेहनत :या वर्षीचा श्रीरामनवमी उत्‍सव यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, समिती सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ, मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली संस्‍थानचे सर्व प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख आणि सर्व कर्मचारी प्रयत्‍नशील आहेत.

हेही वाचा :

  1. गर्दी न जमल्यानं झाला वाद; माजी आमदार आणि जिल्हाप्रमुखांमध्ये हाणामारी - Amravati Lok Sabha Constituency
  2. पाहिजे असलेले मतदारसंघ न मिळाल्यानं कार्यकर्ते नाराज होणारच, पक्षश्रेष्ठींकडं भावना कळवल्या - वर्षा गायकवाड - Lok Sabha Election 2024
  3. मुलाच्या विरोधात निवडणूक लढवणार का? गजानन किर्तीकरांनी थेटच सांगितलं... - Gajanan Kirtikar

ABOUT THE AUTHOR

...view details