पुणे Pune ISIS Module Case : पुणे इसीस दहशतवाद मोड्युल प्रकरणी एनआयए मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पुण्यातील कोंढवा येथील 4 प्रॉपर्टी जप्त करण्यात आल्या आहेत. पुण्यातील कोथरूड भागात जुलै 2023 मध्ये तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी त्यांचं सातारा कनेक्शन उघड झाल्यानंतर आता हे दहशतवादी ज्या ठिकाणी राहत होते, त्या प्रॉपर्टीज एनआयएनं जप्त केल्या आहेत.
सातारा कनेक्शन उघड :काही दिवसांपुर्वीपुण्यातून पकडलेल्या इसीसच्या दहशतवाद्यांनी साताऱ्यात लूट केल्याचं उघड झालं होतं. साताऱ्यातील एका साडीच्या दुकानदाराला बंदुकीच्या धाकावर या दहशतवाद्यांनी लुटलं. त्याच्याकडून घेतलेल्या एक लाख रुपयातून बॉम्ब बनवण्याचं सामान घेतल्याचंही तपासात पुढं आलं. पुण्यातील कोथरुड भागात जुलै 2023 मध्ये तीन दहशतवाद्यांना पकडण्यात आलं होतं. मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी, मोहम्मद शाहनवाज आलम आणि मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान या तीन दहशतवाद्यांचा यात समावेश होता. दहशतवाद्यांनी टेरर फंडिंगसाठी कशा प्रकारे पैसे जमा केले आणि ते पैसे नेमके कोणाकोणाला आणि कशा प्रकारे दिले गेले याबाबतचा तपास सुरू होता.