बीड NEET Paper Leak Beed Connection : देशभरात गाजत असलेल्या नीट घोटाळ्यात लातूर, धाराशिवनंतर आता बीड कनेक्शन उघडकीस आलं आहे. जिल्ह्यातील दोन संशयित तपासात समोर आले असून त्यामधील एक बीडचा तर दुसरा माजलगावचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नीट घोटाळ्यात या दोघांनाही संशयित म्हणून चौकशीसाठी नांदेड एटीएसनं बोलावून घेतलं. हे दोघंही लातूरच्या एका आरोपीचे सब एजन्ट म्हणून काम पहात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पोलिसांनी प्रथमदर्शनी दिलेल्या माहितीवरुन बीड जिल्ह्यातून दोघांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केल्यानंतर आणखी काही नावं पुढं येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे शिक्षणं क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
लातूरच्या आरोपीचे सब एजन्ट :नीट प्रकरणात बीड कनेक्शन पुढ आल्यानं मोठी खळबळ उडाली. हे दोघंही लातूरच्या आरोपीचे सब एजन्ट म्हणून काम पाहत होते. त्यांना नांदेड एटीएसनं चौकशीसाठी बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील एक संशयित हा बीडचा असून दुसरा संशयित हा माजलगावचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान या प्रकरणी लातूर पोलिसांनी बीड जिल्ह्यातील सात पालकांची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.