महाराष्ट्र

maharashtra

नवाब मलिकांचे जावई समीर खान यांना थारची जोरदार धडक; चालकाचा पडला अ‍ॅक्सिलेटरवर पाय अन् घडला अनर्थ; निलोफर मलिकही जखमी - Nawab Malik Son In Law Injured

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2024, 8:29 AM IST

Updated : Sep 18, 2024, 12:45 PM IST

Nawab Malik Son In Law Injured : माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना कारनं जोरदार धडक दिल्यानं ते गंभीर जखमी झाले. या धडकेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी वृत्तसंस्थेला दिली. या अपघातात नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक या देखील जखमी झाल्या आहेत.

Nawab Malik Son In Law Injured
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

मुंबई Nawab Malik Son In Law Injured : ब्रेकऐवजी चुकून अ‍ॅक्सिलेटरवर पाय पडल्यानं थारच्या जोरदार धडकेत माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान हे गंभीर जखमी झाले. त्यांच्याच थार कारनं त्यांना ठोकरल्याची धक्कादायक घटना कुर्ला इथं घडली आहे. या अपघातात नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक या देखील जखमी झाल्या आहेत. रुग्णालयात तपासणी करण्यास गेलेल्या समीर खान आणि निलोफर मलिक यांना घेण्यासाठी चालक आला असता, हा अपघात घडला.

नवाब मलिक यांच्या जावायाला थारची जोरदार धडक :नवाब मलिक यांचे जावई समीर खान हे निलोफर मलिक यांच्यासह रुग्णालयात गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या चालकाला गाडी घेऊन येण्यास सांगितलं. चालक त्यांची थार कार घेऊन रुग्णालयात त्यांना घेण्यासाठी आला. मात्र यावेळी चालकाचा ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलेटरवर पाय पडल्यानं थारची जोरदार धडक समीर खान यांना बसली. या धडकेत समीर खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी वृत्तसंस्थेला दिली आहे. या अपघातात नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक या देखील जखमी झाल्या आहेत, अशी माहितीही त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. Drugs case : नवाब मलिकांचे जावई समीर खान यांचा जामीन रद्द करण्यासाठी एनसीबीची मुंबई उच्च न्यायालयात धाव
  2. 'मला ड्रग्ज पेडलरची बायको म्हणून हिनवलं', नवाब मलिक यांच्या मुलीचं सोशल मीडियावर भावनिक पत्र
  3. ड्रग्ज प्रकरण : समीर खान यांचा जामीन रद्द करण्यासाठी एसआयटी न्यायालयात याचिका करणार दाखल
Last Updated : Sep 18, 2024, 12:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details