नवी मुंबई Jasai village murder case :उरण तालुक्यातील जासई गावात एक थरारक घटना घडली होती. शनिवारी गावातील दि.बा. पाटील सभागृहाजवळ असणाऱ्या निर्जन ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्यानं मित्राची हत्या केल्याची कबुली पतीनं दिली आहे.
अनैतिक संबंधातून हत्या :आरोपी आणि मृत दोघेही सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील रहिवाशी आहेत. दोघंही एकाच ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून काम करत होते. त्यामुळं दोघांमध्ये घट्ट मैत्री होती. हे दोघेही उरण तालुक्यातील जासई गावात भाड्यानं राहत होते. त्यामुळं त्यांचं एकमेकांच्या घरीही येणं-जाणं होतं. यादरम्यान एका मित्रानं दुसऱ्या मित्राच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवले. याबाबत आरोपीनं मित्राला अनेकदा समज दिली होती. मात्र, आरोपीनं सांगूनही त्यानं पत्नीसोबत अनैतिक संबंध सुरुच ठेवले. त्यामुळं आरोपीनं मित्राचा कायमचा काटा ठरवलं. शुक्रवारी रात्री आरोपीनं जेवणाच्या बहाण्यानं त्याला घरी बोलावलं होतं. त्यानंतर आरोपीनं मित्राला दारू पाजली. मित्र दारूच्या नशेत झोपी गेल्यानं आरोपीनं त्याच्या डोक्यात दगडानं वार करून त्याचा खून केला. त्याचवेळी आरोपीनं पत्नीच्या डोक्यावरही वार करून तिलाही जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यानं पत्नीवर दबाव टाकून मृतदेह एका पांढऱ्या प्लास्टिकच्या गोणीत भरला. त्यानंतर मृतदेह पत्नीच्या मदतीनं जासई गावात दि.बा पाटील सभागृहजवळ फेकला. त्यानंतर आरोपींनी पलायनं केलं.