महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सर्वाधिक उष्ण 'नवतपा'ला प्रारंभ; चंद्रपुरात अघोषित आणीबाणी...रस्त्यांवर शुकशुकाट - Navatpa 2024

Navatpa 2024 : आजपासून 'नवतपा'ला सुरूवात होत झालीय. तर अंगाची लाही-लाही होणं काय असतं, याचा प्रत्यय आज चंद्रपूरकरांना आलाय. शहराचं आजचं तापमान 44 डिग्री सेल्सिअस एवढे होते. त्यामुळं रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.

Navatpa 2024
चंद्रपुरात नवतपा (MH DESK)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 25, 2024, 7:52 PM IST

चंद्रपूर Navatpa 2024: शहरात आज दुपारच्यावेळी अघोषित संचारबंदी लागली की, काय असं चित्र बघायला मिळतय. आजपासून 'नवतपा' सुरू झाल्यानं लोक घरातून बाहेर पडण्यास अनुत्सुक असल्याचं दिसून आले. त्यामुळं शहराच्या रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळाला. जर अति महत्वाचं काम पडलंच तर लोक बाहेर पडत होते. 'नवतपा' सुरू झाल्यानं याचा परिणाम चंद्रपुरकरांवर झाल्याचा दिसून आला.

चंद्रपुरात सूर्य कोपला... रस्त्यांवर शुकशुकाट (ETV Bharat Reporter)



काय आहे नवतपा : चंद्रपूर शहर प्रसिद्ध आहे ते उन्हाळ्यात सर्वाधिक असलेल्या तापमानामुळं, दरवर्षी उन्हाळ्यात हा शहरात तापमानाचा उच्चांक गाठलेला असतो. उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा हा 'नवतपा' असतो. नवतपा म्हणजे तापमान वाढीचे नऊ दिवस. या दिवसांत उन्हाचा पारा उंच्चांक गाठत असतो. सूर्याची किरणे यावेळी थेट पडत असतात. त्यामुळं सकाळपासून ते सायंकाळी सहापर्यंत सूर्य तळपत असतो. त्यामुळं या काळात चंद्रपुरात सर्वाधिक तापमान असते. सध्या चंद्रपुरात उन्हाचा पारा हा 44 डिग्री पर्यंत पोचला आहे. आज पहिल्या दिवशी देखील ही दाहकता जाणवत होती. त्यामुळं पुढचे आठ दिवस हे चंद्रपुरकरांसाठी आव्हानाची ठरणार आहेत.



उष्माघातापासून वाचण्यास हे करा: उष्माघातामुळं मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळं याबाबत काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. दुपारी बाहेर पडताना उन्हाचा थेट संपर्क टाळावा, सुती आणि मोकळे कपडे घालावे, जास्तीत जास्त पाणी प्यावे, अशक्त अथवा चक्कर आल्यासारखं वाटल्यास त्वरीत नजीकच्या दवाखान्यात जावे.



मनपाने उघडले कोल्डवॉर : उष्माघात झाला असताना नागरिकांवर त्वरित उपचार करता यावे, यासाठी अनेक ठिकाणी कोल्डवॉर रूम उघडण्यात आले आहे. इलाज करण्यासाठी जबाबदार आरोग्य यंत्रणा देखील तैनात केलीय.

ABOUT THE AUTHOR

...view details