महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तीन मुलांना विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न; पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या, दोघे फरार - Nashik Crime

Nashik Crime : नाशिकमधून धक्कादायक प्रकार समोर आलाय. तीन अल्पवयीन मुलांना विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आलीय. या प्रकरणी मुलांच्या आई-वडिलांनी पोलिसांत धाव तक्रार दाखल केली.

Nashik Crime
विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न (Source - ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2024, 6:33 PM IST

नाशिक Nashik Crime :नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात तीन शाळकरी मुलांना विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. दैव बलवत्तर म्हणून यातील एका चिमुरड्यानं स्वतःसह इतर दोघांचा जीव वाचविण्यात यश मिळाल्यानंतर या घटनेला वाचा फुठली. या घटनेबाबत सिन्नर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं. तीन अल्पवयीन चिमुकल्यांना विहिरीत लोटून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय.

नेमकं प्रकरण काय? :या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक सिन्नर तालुक्यातील पळसेजवळील वडगाव पिंगळमध्ये बुधवारी दि. 18 रोजी सायंकाळी 6 ते 6.30 च्या सुमारास आदित्य योगेश सानप, अथर्व संतोष घुगे तसंच वरद संतोष घुगे हे तिघं खेळत होते. यावेळी संशयित आरोपी अमोल लांडगे यानं त्यांना विहिरीजवळ जा आणि तिथं असणाऱ्या दोघांकडून कासव घेऊन या आणि मला द्या असं सांगितलं. तिन्ही मुलं कासव आणण्यासाठी विहिरीकडे गेली. विहिरीजवळ आल्यानंतर तिथं असलेल्या विक्रम माळी, साईनाथ ठमके आणि अमोल लांडगे या तिघा संशयितांनी मुलांना विहिरीत फेकलं आणि घटनास्थळावरून पळ काढला.

मित्रांचेही वाचवले प्राण :विहिरीत पडलेल्या तिन्ही मुलांचा जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू होती. यातील एकानं यातील एकानं विहिरीत असलेल्या मोटारीची दोरी पकडून स्वत:ला सावरत इतर दोघांचा जीव वाचवला. घरचे रागावतील म्हणून त्यांनी घडलेला प्रकार कोणाला सांगितला नाही. मात्र, ओल्या कपड्यांमुळं घरच्यांना संशय आला. त्यांनी तिघांना विश्वासात घेत विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर तीनही मुलांच्या पालकांनी आणि गावकऱ्यांनी एकत्र येत या संपूर्ण प्रकरणाविषयी सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आरोपींवर कठोर कारवाईची मागणी :घटनेचं गांभीर्य ओळखून सिन्नर पोलिसांनी तपास करून संशयितांचा शोध घेत संशयित अमोल लांडगे याला बेड्या ठोकल्या. दोन फरार संशयितांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या मुलांना मारण्यामागचा हेतू काय होता? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

हेही वाचा

  1. क्रिप्टोकरंन्सीचा नवा झोल; तपास यंत्रणा पोलीस संभ्रमात, सात जणांना अटक - Sambhaji Nagar Crime News
  2. शीरासह धड वेगळे करून हत्या करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला सांगलीतून अटक, गुन्ह्याचं कारण धक्कादायक - Thane crime
  3. धारावीत चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक - Minor girl raped

ABOUT THE AUTHOR

...view details