महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुधाचा टँकर दरीत कोसळल्यानं कसारा घाटात भीषण अपघात; पाच ठार, चार जण गंभीर जखमी - Nashik accident in Kasara ghat - NASHIK ACCIDENT IN KASARA GHAT

Nashik accident in Kasara Ghat : कसारा घाटात दुधाचा टँकर खोल दरीत कोसळल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात पाच जण ठार झाले आहेत. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

Fatal accident in Kasara Ghat
दुधाचा टँकर दरीत कोसळला (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 18, 2024, 8:18 PM IST

Updated : Aug 18, 2024, 8:30 PM IST

नाशिक/ठाणे Fatal accident in Kasara Ghat :नाशिक जिल्ह्यातील सिन्नरहून मुंबईकडं आज दुपारच्या सुमारास दूध घेऊन निघालेला टँकर नाशिक-मुंबई महामार्गावरील नव्या कसारा घाटात खोल दरीत कोसळला. हा टॅंकर सुमारे 200 ते 250 फूट खोल दरीत टँकर कोसळल्यानंतर 5 जण ठार झाले आहेत. तर इतर गंभीर असलेल्या 4 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

दुधाचा टँकर दरीत कोसळला (ETV BHARAT Reporter)


जखमी नागरिक रुग्णालयात दाखल : या अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीमनं घटनास्थळी धावं घेत मदतकार्य सुरू केलं. या भागात पावसाचा जोर अधिक असल्यानं मदतीस अडथळे निर्माण झाले होते. दोरीच्या साहाय्यानं आपत्ती व्यवस्थापन टीमचे कर्मचारी खाली उतरले. त्यांनी तीन गंभीर जखमींना दरीतून बाहेर काढले. जखमींना तातडीने घोटी टोल नाका रुग्णवाहिकेनं कसारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आपत्ती व्यवस्थापन टीमचे शाम धुमाळ, दत्ता वाताडे, देवा वाघ, जास्विंदर सिंग, नाना बोऱ्हाडे, बाळू मांगे, पप्पू सदगीर, कैलास गतिर यांच्यासह इतरांनी 5 मृतदेहांसह 4 जखमी नागरिकांना बाहेर काढलं. जखमींना नरेंद्र महाराज रुग्णवाहिकेतून कसारा, इगतपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलंय. खासगी रुग्णवाहिकेतून मृतदेह कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

  • जखमींची नावे : या अपघातात अक्षय विजय घुगे (30) (रा. निमोन तालुका संगमनेर) श्लोक जायभाय (5) (रा. नालासोपारा), अनिकेत वाघ (21) (रा. निहळ तालुका सिन्नर), मंगेश वाघ (50) (रा. निहळ तालुका सिन्नर) हे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातात पाच व्यक्तींचा मृत्यू :या अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, महामार्गचे डीवायएसपी प्रदीप मैराळे, कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील बच्छाव आणि महामार्ग पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली.

Last Updated : Aug 18, 2024, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details