महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

ETV Bharat / state

मामे बहिणीशी असलेल्या प्रेम संबंधावरून तिघांनी केली तरुणाची हत्या, आरोपी अटकेत - Nagpur Murder News

Nagpur Murder News : मामे बहिणींबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानं एका तरुणाने दोन साथीदारांच्या मदतीनं गट्टूने डोके ठेचून एकाची निर्घृण हत्या (Murder) केली. ही थरारक घटना अंबाझरी पोलिस ठाण्याच्या (Ambazari Police Station) हद्दीतील पांढराबोडी परिसरात घडली.

ETV Bharat Reporter
तरुणाची हत्या (ETV Bharat Reporter)

नागपूर Nagpur Murder News : नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्याच्या (Ambazari Police Station) हद्दीतील असलेल्या पांढराबोडीच्या सुदाम नगरीत तिघांनी संगनमत करून एका तरुणाची निर्घृण हत्या (Murder) केलीय. सागर नकुल नागले उर्फ टूनां (२७) असं मृत तरुणाचं नाव आहे. अजित संतन नेताम आणि सुरेश मनोहर यादव असे आरोपीचे नावे आहेत. या प्रकरणातील एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पुढे आलीय.

अशी घडली घटना :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व आरोपी आणि मयत हे घरात दारू पीत बसले होते. मृतकाने आरोपीच्या मामे बहिणींशी अफेअर असल्याचं सांगितलं. त्यामुळं आरोपीला प्रचंड अनावर आला. आरोपीने कुणाला काहीही कळण्यापूर्वी सोप्याखाली ठेवलेला सिमेंटचा गट्टू सागरच्या डोक्यात मारला. त्यामुळं सागर जागीच कोसळला. ज्यावेळी आरोपीनं सागरच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला त्यानंतर त्याचे मित्र अजित आणि सुरेश यांनी सुद्धा सागरला मारहाण केल्यानं सागरचा जागीचं मृत्यू झाला.

प्रतिक्रिया देताना पोलीस निरीक्षक विनायक बोल्हे (ETV Bharat Reporter)


तीनही आरोपी अटक, एक अल्पवयीन? : घटनेची माहिती समजताचं अंबाझरी पोलिसांनी लगेच घटनास्थळी दीखल झाले. घटनास्थळाच पंचनामा केल्यानंतर सागर उर्फ टूनां यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून आरोपींचा शोध सुरू केला. अवघ्या काही मिनिटांमध्ये तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अजित संतन नेताम आणि सुरेश मनोहर यादव यांचा समावेश असून तिसरा आरोपी सज्ञान आहे की, अल्पवयीन या संदर्भात शहानिशा केली जात आहे.


परिसरात बंदोबस्त तैनात, शांतता : सागरची हत्या झाल्याचं समजल्यानंतर सुदाम नगरी परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्यानं पोलिसांनी परीसरात बंदोबस्त तैनात केलाय. सध्या या भागात शांतता असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनायक बोल्हे यांनी दिली.

हेही वाचा -

  1. पानठेल्यावर सिगरेटचा धूर तोंडावर सोडल्यानं झालेल्या वादातून एकाची हत्या; उपराजधानीतील घटना - Nagpur Murder News
  2. Nagpur Murder Case: कौटुंबिक वादातून मेहुण्यानं केली जावयाची हत्या...
  3. दारू पार्ट्यांमुळे पुरुषोत्तम पुट्टेवार 'हिट अँड रन' सुपारी किलिंग हत्या प्रकरणाचा झाला उलगडा - Nagpur Murder Case

ABOUT THE AUTHOR

...view details