महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nagpur Murder Case: कौटुंबिक वादातून मेहुण्यानं केली जावयाची हत्या... - Nagpur Murder Case

Nagpur Murder Case : कुटुंबातील किरकोळ वादातून मेहुण्यानं आपल्याच जावयाची हत्या केल्याची घटना घडली (Nagpur Crime News) आहे. ही घटना नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशन (Belatarodi Police Station) अंतर्गत घडली आहे.

Nagpur Murder Case
जावयाची हत्या

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 12, 2024, 10:38 PM IST

नागपूर Nagpur Murder Case : नागपूर शहरातील बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या (Belatarodi Police Station) हद्दीतील रचना गृह निर्माण सहकारी संस्था येथे काम करणाऱ्या एक तरुणाची हत्या झाल्याची घटना (Nagpur Crime News) उघडकीस आलीय. रवी कहार असं हत्या झालेल्याचं नाव आहे. रवी कहारची हत्या त्यांच्याचं मेहुण्यानं (साळा) अरुण अन्नू बनवारी यानं केली आहे. जावायाची हत्या केल्यानंतर आरोपी मेहुणा अरुण पळून गेल्यानं बेलतरोडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

लाकडी दांडयाने केली मारहाण: हत्या प्रकरणातील मृतक रवी गलीचंद कहार आणि आरोपी अरूण बनवारी जवाई-साळा आहेत. ते बेलतरोडी हद्दीतील रचना गृह निर्माण सहकारी संस्था शिवनगाव पुनर्वसन ले-आउट येथे गटार पाईप लाईनचं काम करण्यासाठी मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथून नागपूरला आले होते. आरोपी अरुण आणि रवी यांच्यात अज्ञात कारणावरून भांडण झालं असता आरोपी अरूण बनवारीने रागाच्या भरात जवाई रवीला लाकडी दांडयानं मारहाण करून गंभीर जखमी केलं होतं. त्यानंतर रवीला उपचारसाठी मेडीकल हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषीत केलं. याप्रकरणी फिर्यादीने तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.


किरकोळ वादातून झाली हत्या: या घटनेतील मृतक रवी कहार छिंदवाडा येथील रहिवासी आहेत. ते त्याची पत्नी आणि मेहुणा तिघेही नागपूर येथे एकत्र राहत होते. ते तिघेही दोन महिन्यांपूर्वीच नागपुरात आले होते. अज्ञात कारणावरून दोघांच्या पत्नीमध्ये भांडण झालं होतं, त्या वादाचं रूपांतर हत्येच्या घटनेत झालंय.



मंगेश मेंढे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक: याआधीही अशीच एक घटना घडली होती. मार्च महिन्याच्या सुरुवातीला मंगेश गणेश मेंढे, यांची हत्या करण्यात आली होती. कपिल नगर पोलिसांनी आरोपी दत्तु उर्फ दत्त्या उर्फ राहुल रमेश रामटेकेला अटक करण्यात आली आहे. दारूसाठी पैसे न दिल्यानं मंगेशची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी ऋषभ उर्फ ददु सुभाष चाफेकर, हर्षदीप उर्फ वारल्या लक्ष्मण नगरारे, ईरशाद उर्फ नौशाद शौकत अली, संतोष उर्फ पापा गौरी नक्के, सतिष गौरी नक्के, मोहम्मद बिलाल कासीम अंन्सारी त्यांना ताब्यात घेवुन विचारापुस केली असता, त्यांनी मृतक यास दारू पिण्यासाठी पैसे मागीतले असता मंगेश गणेश मेंढे यांनी पैसे दिले नाही. या कारणावरून आरोपीने मंगेश गणेश मेंढची हत्या केल्याची कबुल दिली आहे.

हेही वाचा -

  1. Pune Crime News : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही; पतीनं पत्नीला संपवलं; पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
  2. मामीच्या सौंदर्यावर भाळला भाचा; शरीरसुखाची मागणी, नकार अन् थेट खून
  3. पूर्ववैमनस्यातून उद्धव ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखाच्या मुलाची हत्या, पिंपरी चिंचवड हादरले

ABOUT THE AUTHOR

...view details