नागपूर Fire Breaks Out At Biodiversity Park : नागपूरच्या वाडी-हिंगणा या मार्गावर असलेल्या बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये रात्री मोठी आग लागली आहे. या आगीनं सुमारे एक किलोमीटर रुंदीचा परिसर कवेत घेतला आहे. पार्कमधील गवत आणि झाडी-झुडपं जळून खाक झाली आहेत. वाडी-हिंगणा रोडवरील बायोडायव्हर्सिटी पार्क सुमारे दोन हजार एकर क्षेत्रात पसरला असून या ठिकाणी ससे, हरिण, रानडुक्कर, बिबट असे प्राणी आणि पक्षांच्या शेकडो प्रजाती आहेत.
गेल्या वर्षी सुद्धा बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये उन्हाळ्याच्या काळात आग लागून शेकडो एकर जमिनीवरील गवत आणि झुडपांचं मोठं नुकसान झालं होतं. पहाटेपासून आग नियंत्रणात आहे, मात्र अजूनही धूर दिसून येत आहे.