मुंबई -मध्य रेल्वेच्या प्रवाशांना विस्तारित लोकल ट्रेननं प्रवास करण्याचा पर्याय असेल तर पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना नवीन लोकल ट्रेननं प्रवास करण्याचा पर्याय असणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय गाड्यांसाठी नवे वेळापत्रक तयार करण्यात आलं आहे. शनिवारी 5 ऑक्टोबरपासून हे नवीन वेळापत्रक लागू होईल, अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी दादर स्थानकाच्या फलाटावर काम सुरू करण्यात आलं आहे. दादरमधील प्लॅटफॉर्म क्रमांक 11 चा वापर वाढवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून धावणाऱ्या 11 लोकल गाड्या आता दादर स्थानकावरून धावणार आहेत. दादरपर्यंत धावणाऱ्या 24 लोकल गाड्या परळपर्यंत वाढवण्यात येणार आहेत.
मुंब्रा आणि कळव्याच्या प्रवाशांना दोन नवीन लोकल-मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी दिलेल्या माहितीनुसार गर्दीच्या वेळी मुंब्रा आणि कळवा स्थानकात जलद लोकल गाड्यांना थांबा देण्याची मागणी नव्या वेळापत्रकात समाविष्ट करण्यात आली आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी, जलद लोकल कळवा येथे सकाळी 8:56 वाजता आणि मुंब्रा येथे 9:23 वाजता थांबणार आहेत. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी, जलद लोकल गाड्या कळवा येथे 7:29 वाजता आणि मुंब्रा येथे 7:47 वाजता थांबणार आहेत. या निर्णयामुळे मुंब्रा आणि कळव्याच्या प्रवाशांना दोन नवीन जलद लोकल उपलब्ध होणार आहेत. सोबतच या निर्णयामुळे दादर स्थानकावर गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामध्ये परळ स्थानकाचादेखील वापरणार आहे.
ठाणे ते कल्याणपर्यंत अतिरिक्त 6 गाड्या -नवीन वेळापत्रकानुसार रेल्वेनं स्थानकांवरील गर्दी कमी करण्यावर अधिक भर दिला आहे. गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेवरील दादर स्थानकावर गेल्या अनेक महिन्यांपासून स्टॉल हटवणे आणि फलाट रुंदीकरणाचे काम सुरू होते. याचे परिणाम स्वरूप नव्या वेळापत्रकात पाहायला मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून सुटणाऱ्या 11 सेवा दादरला समाप्त होणार आहेत. तर दुसरीकडे दादर स्थानकात शेवट होणाऱ्या 24 लोकल सेवा परळपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत ठाण्यापलीकडे मध्य रेल्वेवर गर्दी वाढत आहे. अशा स्थितीत रेल्वेने ठाणे ते कल्याणपर्यंत अतिरिक्त 6 गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा-
- प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! पश्चिम रेल्वेच्या 175 लोकल रद्द, ट्रेनच्या वेगावरही येणार मर्यादा; नेमकं कारण काय? - Western Railway Block
- भाजपाच्या नेत्याचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह; आत्महत्या की हत्या, यावरुन उलट सुलट चर्चा, 'या' विरोधी पक्षनेत्याचे होते भाऊ - BJP Leader Body Found