मुंबई Mumbai Local Train Mega Block :मुंबईकर रविवारी सुट्टी असल्यानं घराबाहेर पडण्याचा विचार करतात. मात्र, रविवारी मध्य रेल्वे, हार्बर मार्गावर व पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर ब्लॉक घेण्यात आलाय. त्यामुळं याची माहिती घेऊन मुंबईकरांनी लोकल प्रवासाचे नियोजन करण्याची गरज आहे.
मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी ब्लॉक घेण्यात आलाय. मध्य रेल्वेच्या उपनगरीय विभागावर मेगाब्लॉक घेण्यात आलाय तर पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात आलाय.
मध्य रेल्वे मार्गावर कधी व कुठे मेगाब्लॉक असेल? : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी २.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा या कालावधीत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात आल्यात व त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबा घेऊन या गाड्या त्यांच्या गंतव्य स्थानावर १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. तर, ठाण्यापुढे जाणाऱ्या सर्व जलद गाड्या मुलुंडपासून डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्यात.
ठाणे रेल्वे स्थानकातून सकाळी १०.५० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड रेल्वे स्थानकापासून अप धीम्या मार्गावर वळवल्या आहेत. या गाड्या मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यावर थांबून पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवल्या आहेत. तसेच त्यांच्या गंतव्यस्थानावर १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल? :छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी डाऊन जलद मार्गावर १०.२० वाजता बदलापूर लोकल सुटेल, ब्लॉकपूर्वीची ती शेवटची लोकल असेल. तर दुपारी ३.०३ वाजता सुटणारी बदलापूर लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ब्लॉकनंतरची पहिली लोकल असेल.
अप जलद मार्गावर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ११.१० वाजता पोचणारी अंबरनाथ लोकल ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल असेल. तर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुपारी ०३.४९ वाजता पोचणारी कसारा लोकल ही ब्लॉकनंतरची पहिली लोकल असेल.
सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत अप आणि डाऊन हार्बर मार्गावर पनवेल- वाशी दरम्यान (नेरुळ/बेलापूर-उरण पोर्ट मार्ग वगळून) मेगाब्लॉक घेण्यात येईल.
पनवेल येथील सेवा बंद : पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा पूर्णत: बंद राहील.
सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत पनवेल ते ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत ठाणे येथे जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा पूर्णत: बंद राहतील.