मुंबई Crime News: राज्यातील महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गोरेगाव येथील गावदेवी मंदिरात पुजाऱ्यानेच पाच वर्षाच्या अल्पवयीन चिमुकली सोबत अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानं एकच घडबळ उळाली आहे. या प्रकारामुळे मंदिरातच मुली सुरक्षित नसतील तर इतर ठिकाणचं काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या प्रकरणामुळे सध्या गोरेगाव परिसरात तणावाच वातावरण आहे. संबंधित पुजाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे. ही घटना बुधवारी 12 जून रोजी घडली असून रविवारी हे प्रकरण उघडकीस आलं.
असा आहे संपूर्ण प्रकरण:याबाबत गोरेगाव पोलिसांनी दिलेली माहितीनुसार सदर घटना मुंबईच्या गोरेगाव येथील जवाहर नगर परिसरातील गावदेवी मंदिरात घडली आहे. 5 वर्षीय अल्पवयीन मुलगी 12 जून रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आपल्या नातेवाईकांसोबत गावदेवी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. मंदिरात दर्शन झाल्यानंतर इथल्या पुजाऱ्यानं मुलीला प्रसाद देण्याच्या बहाण्याने गाभाऱ्याच्या मागील बाजूस नेले. पीडित चिमुकली बराच वेळ न दिसल्यानं नातेवाईकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी मंदिरातील पुजारी या चिमुकली सोबत अश्लील कृत्य करत असल्याचं नातेवाईकांच्या निदर्शनास आलं.