मुंबईsuicide :भाविक शहा (वय 38) याच्याविरुद्ध 15 फेब्रुवारी रोजी समता नगर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कांदिवली पूर्वेतील तरुणी ही भाविक शहा लिव्ह इन पार्टनरशिपमध्ये राहत होती. तिच्या मृत्यूप्रकरणात बहिणीनं पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी भाविकविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे अन्य मुलींसोबत असलेल्या संबंधांमुळं बहिणीनं जीवन संपवल्याचं तक्रारीत नमूद केलं आहे.
मैत्रीचं रुपांतर प्रेमात :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी ही जून 2023 पर्यंत वांद्रे पश्चिम येथे तिच्या पालकांसोबत राहत होती. ती गेल्या 3-4 वर्षांपासून नैराश्यानं त्रस्त होती. ती डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घेत होती. 2020 मध्ये, जुहू येथील एका कॉलेजमध्ये फॅशन डिझायनर कोर्स करत असताना तिची भाविक शहाशी मैत्री झाली होती. खेळणी बनवण्याचा व्यवसाय करणाऱ्या भाविक शहालाही नैराश्य, मधुमेहाचा त्रास होता. त्यातून दोघांचं मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. जून 2023 मध्ये, तिच्या कुटुंबाच्या विरोधात तरुणीनं भाविकसोबत कांदिवली पूर्वेतील लोखंडवाल टाऊनशिपमध्ये लिव्ह-इन पार्टनर म्हणून राहण्याचा निर्णय घेतला होता.
भाविकच्या प्रकरणामुळं मानसिक त्रास : ऑक्टोबर 2023 मध्ये, तिच्या वाढदिवसासाठी बहीण घरी गेली होती. तेव्हा, तिच्या पालकांनी घरी परतण्याचा सल्ला दिला होता. पण तिनं भाविकला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला. 26 ऑक्टोबर 2023 रोजी भाविकचं मधुमेहाचं औषध खाल्ल्यानंतर तरुणीला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ती भाविकच्या अनेक प्रकरणांमुळं त्रास होत असल्याचं तिनं बहिणीला सांगितलं होतं. तसंच ती आत्महत्या करणार असल्याचदेखील म्हणाली होती.
सनावर वारंवार आत्याचार : या घटनांदरम्यान तरुणीचं कुटुंबीय तिच्या संपर्कात होतं. तसंच भाविक तिच्यावर अत्याचार करत असल्याचं तिनं अनेकदा कुटूंबाला सांगितलं होतं. भाविक तिनं समजवून सांगत त्यानं बाहेरचे प्रेम प्रकरण बंद न केल्यास आत्महत्याचा इशारा दिला होता. मात्र, भाविकनं त्याकडं दुर्लक्ष केलं. जानेवारी 2024 मध्ये, पीडितेनं तिच्या मनगटाची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, या घटनेतून ती बचावली होती.
24 जानेवारी केली आत्महत्या :23 जानेवारी रोजी भाविकनं प्रेयसीला भेटल्यानंतर घरी परतल्याचं कबूल केलं. 24 जानेवारी रोजी पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांना तिनं आत्महत्या केल्याची माहिती दिली. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीनं पीडितेसोबत वाद घातला. दारू पिऊन बेडरूममध्ये कोंडून घेतल्यानंतर पीडित तरुणीनं औषध प्यायलं होतं. त्यानंतर तरुणीनं बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानं भाविकनं इमारतीच्या वॉचमनला बोलावून बेडरूमचा दरवाजा तोडला होता. त्यानंतर भाविक तसंच वॉचमननं तिला ऍपेक्स हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. त्यावेळी डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं.
- 306 अंतर्गत गुन्हा दाखल : या प्रकरणी पीडितेच्या बहीणीनं भाविकविरोधात तक्रार दिल्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिनं दिलेल्या तक्रारीत जाणीवपूर्वक बहिणीला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. भाविकवर भारतीय दंड संहितेच्या कलम 306 अंतर्गत (आत्महत्येस प्रवृत्त) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हे वाचलंत का :
- आम्ही नाही तर देशाचे पंतप्रधान सेल्फीचं प्रमोशन करतात, सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर
- इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा कमल घेणार हातात 'कमळ'; नाथ सोडणार काँग्रेसचा 'हाथ'
- ...तर 21 फेब्रुवारीला आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार; मनोज जरांगे पाटलांचा इशारा