महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बालकांची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, डॉक्टरसह दहा जणांना अटक - Child Trafficking Case Mumbai - CHILD TRAFFICKING CASE MUMBAI

Child Trafficking Case Mumbai : लहान बालकांची विक्री करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टरसह दहा जणांना अटक केली आहे. यातील बहुतांश आरोपी महिला या एग डोनर असल्याचे तपासात निष्पन्न झालं असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Child Trafficking Case Mumbai
बालकांची तस्करी

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 28, 2024, 10:57 PM IST

मुंबईChild Trafficking Case Mumbai :लहान बालकांची विक्री करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आतापर्यंत या टोळीने 14 बालकांची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी दोन बालकांची सुटका करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

आरोपी महिला एग डोनर :मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक दोनला लहान बालकांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आणि तपास करून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपी महिला या एग डोनर आहे. त्याच बालकांची खरेदी विक्री करण्यास इच्छुक असणाऱ्या पालकांना हेरत असत. त्यानंतर या बालकांची 80 हजार रुपये ते 4 लाख रुपयांपर्यंत विक्री केली जात असे. यामध्ये बालकाच्या मूळ पालकांसह यात सहभागी असलेल्या सर्व दलालांची हिस्सेदारी ठरलेली असे. मुंबई तसेच महाराष्ट्रातून खरेदी करण्यात आलेल्या बालकांची विक्री ही तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यासारख्या राज्यातदेखील होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दोन बालकांची केली सुटका :मुंबई गुन्हे शाखा क्रमांक दोनच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार विक्रोळी येथील एका पाच महिन्यांच्या बाळाची शितल वारे नावाच्या महिला आरोपीने डॉ. संजय खंदारे यांच्या मदतीने 2022 मध्ये दोन लाख रुपयांना विक्री केली होती. पोलिसांनाही माहिती मिळताच पोलिसांनी बालकाचा शोध घेऊन रत्नागिरीच्या गुहागरमधून त्याची सुटका केली. तर याच शितल वारे हिने दलाल शरद देवर आणि स्नेहा सूर्यवंशी यांच्या मदतीने दोन वर्षांच्या मुलीची अडीच लाख रुपयांमध्ये विक्री केल्याची माहिती तपासात समोर आली. या मुलीची पोलिसांनी मालाड येथून सुटका केली आहे. सुटका केलेल्या या दोन्ही बालकांना महालक्ष्मी येथील बाल अशा ट्रस्टमध्ये ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित बारा बालकांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा :

  1. काँग्रेसला औरंगजेबचे अत्याचार आठवत नाही का?; कर्नाटकात पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर साधला निशाणा - Lok Sabha Election 2024
  2. तुतारी की घड्याळ? दोन्हीकडं फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांचा सज्जड दम म्हणाले, कुुंकू लावायचे असेल तर... - Lok Sabha Election 2024
  3. "मराठा आरक्षणात सगेसोयऱ्यांना विरोध करणाऱ्यांना असं पाडा की...", मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आवाहन - Manoj Jarange Patil Appeal

ABOUT THE AUTHOR

...view details