महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दाऊद टोळीचा हस्तक इम्रान कालियाला खंडणी प्रकरणी अटक, महिलेला धमकावून उकळले होते 46 लाख रुपये - Crime News

Mumbai Crime News : मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं दुबईत राहणाऱ्या 47 वर्षीय महिलेला धमकावून 46 लाखांचा हफ्ता वसूल केल्याप्रकरणी इम्रान मोहम्मद हानीफ खान उर्फ ​​इम्रान कालिया याला अटक केलीय.

इम्रान कालियाला खंडणी प्रकरणी अटक
इम्रान कालियाला खंडणी प्रकरणी अटक (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 5, 2024, 10:43 PM IST

मुंबई Mumbai Crime News : दाऊद टोळीचा सदस्य आणि दाऊदचा नातेवाईक असल्याचं सांगून दुबईत राहणाऱ्या 47 वर्षीय महिलेला धमकावून 46 लाखांचा हफ्ता वसूल केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं इम्रान मोहम्मद हानीफ खान उर्फ ​​इम्रान कालिया याला अटक केलीय, अशी माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिलीय. तसंच महिलेची कालियासोबत ओळख करुन देणारा रशीद हा वॉन्टेड आरोपी आहे. हा आरोपी दुबईत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय.

व्यवसायात पैसे गुंतवण्याचं सांगत फसवणूक : खंडणी विरोधी पथकाला दिलेल्या तक्रारीत महिलेनं म्हटलंय की, ती तिच्या दोन मुलांसह दुबईत राहाते आणि मुंबईलाही येते. त्या महिलेच्या पतीचं निधन झाल्यानं ती दुबईत आपल्या दोन मुलांसह राहाते. दुबईमध्ये एका भारतीयाचं कॅफे आहे. तिथं दुबईत राहणाऱ्या मात्र भारतीय असलेल्या रशीदनं या महिलेची ओळख इम्रान कालियाशी भारतीय कॅफेमध्ये भेटले तेव्हा करुन दिली. तेव्हापासून इम्रान आणि 47 वर्षीय महिलेची मैत्री झाली. त्यानंतर इम्राननं महिलेला सांगितलं की, तो सोन्याचा व्यवसाय करतो. तू सुद्धा या सोन्याच्या व्यवसायात पैसे गुंतव तुला परतावा चांगला मिळेल. इम्राननं महिलेवर त्याच्या सोन्याच्या व्यवसायात पैसे गुंतवण्यासाठी दबाव टाकला.

आरोपीला 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी : इम्राननं दुबईत महिलेसोबत अनेक छायाचित्रंही काढली होती. ते फोटो व्हायरल करण्याच्या नावाखाली तो महिलेकडून पैसे उकळत होता. इम्राननं मीरा रोड परिसरात असलेल्या महिलेचा फ्लॅट विकून 30 लाख रुपये रोख रक्कम आणि 13 लाख 80 हजार रुपयांचा चेक घेतला. हा सर्व व्यवहार 2022 मध्ये झाला होता. तो महिलेकडं वारंवार पैशांची मागणी करत होता आणि दाऊदच्या नावानं तिला आणि तिच्या मुलांना मारण्याच्या धमक्या देत होता. गेल्या दोन वर्षांनंतर महिलेनं हिंमत दाखवून त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर खंडणी विरोधी पथकानं गुन्हा दाखल केला आणि इम्रान कालियाला अटक करुन न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय. इम्रान याच्याविरुद्ध जेजे मार्ग पोलीस स्टेशन आणि नागपाडामध्ये 5 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. ज्यामध्ये चोरी, खंडणी, मोटार वाहने आणि लाईट चोरीचे गुन्हेही नोंदवले गेले आहेत. विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वी इम्राननंच कट रचून जेजे मार्गचे वरिष्ठ निरीक्षक शिरीष गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडून दिलं होतं.

हेही वाचा :

  1. कमी पैशात बियर दिली नाही म्हणून थेट बारमालकावर ताणली रिव्हॉल्वर; अमरावतीतील घटना
  2. भुसावळ हादरलं! माजी नगरसेवक संतोष बारसेंसह सामाजिक कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या
  3. कमी कालावधीत दुप्पट नफा देण्याचं दाखवलं आमिष; फिल्म डायरेक्टरला 1 कोटी 53 लाखांचा गंडा

ABOUT THE AUTHOR

...view details