महाराष्ट्र

maharashtra

पोलिसांच्या मदतीने डान्सबार सुरू, अनिल परब यांचा विधान परिषदेत दावा

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 7:44 PM IST

MLA Anil Parab : विधिमंडळाचं सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विधान परिषद सभागृहात ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी 260 च्या प्रस्तावावर बोलताना मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केला.पोलिसांच्या मदतानंच राज्यात डान्सबार सुरू असल्याचा दावा परब यांनी केला.

अनिल परब विधान परिषदेत
अनिल परब विधान परिषदेत

मुंबईMLA Anil Parab : अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी विधान परिषद सभागृहात ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी 260 च्या प्रस्तावर बोलताना, मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या उडालेल्या बोजवाऱ्याविषयी सरकारवर निशाणा साधला. सरकारमधील लोकप्रतिनिधी बेलगाम झाले असून, प्रत्येकजण बंदूक घेऊन असतो. राजकीय पक्ष नाहीतर गुंडांची टोळी झाली असून, अंतर्गत गँगवॉर सुरू असून एकमेकांचा काटा काढण्याचं काम सुरू असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

पोलीस स्टेशनमध्येच भ्रष्टाचार : पोलिसांच्या बदली प्रकरणात भ्रष्टाचार झाला नसल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले. मात्र, मी नोटीस दिली नसल्यामुळे नावं जाहीर करत नसल्याचं अनिल परब म्हणाले. खरंतर एसपी आमदारांना वाटून दिले आहेत. 25 लाख रुपये एसपीने यांना पोहोचवायचे असा व्यवहार असल्याचा दावाही अनिल परब यांनी केला आहे. हा भ्रष्टाचार नाही तर काय असा प्रश्नही परब यांनी उपस्थित केला आहे. पोलीस बदल्या प्रकरणात पोलीस स्टेशनमध्येच भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

प्रत्येक पोलीस स्थानकाचे रेटकार्ड ठरलेले : यावेळी परब यांनी मुंबईत मोठ्या प्रमाणावर डान्सबार सुरू असून, ज्या ठिकाणी पोलिसांची गाडी उभी आहे तेथे डान्सबार सुरू असल्याचं अनिल परब म्हणाले आहेत. तसंच, बनसोडे तुम्हाला वेळ असेल तर चला किती डान्सबार उघडे आहेत ते तुम्हाला दाखवतो असंही परब यावेळी म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे डान्सबार प्रकरणात गिऱ्हाईकांना घरी सोडायचं काम पोलीस करत असल्याचा आरोप पराब यांनी केला आहे. प्रत्येक पोलीस स्थानकाचे रेटकार्ड ठरले असून, ते ठरवण्याचं काम डीसीपी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे काय सुरू असून, कोण ठरवत आहे हे जर थांबलं नाही तर नावं जाहीर करू मग आमच्यावर केसेस होऊ द्या असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details