मीरा भाईंदर Kashimira Police : शहरात मोबाईल हरवल्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मोबाईल फोन प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील एक महत्वाचा घटक झाला आहे. एखादा फोन हरवला की, सदर व्यक्ती फोन शोधण्यासाठी अतोनात प्रयत्न करतो. कारण, त्याची वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती, इतर महत्वाच्या गोष्टींचा समावेश मोबाईल फोनमध्ये असतो. त्यामुळं मोबाईल फोन हा एक महत्वाचा घटक बनला आहे.
तक्रारदारांना केला मोबाईल परत : मीरा भाईंदर शहरातील नागरिकांचे गहाळ झालेले १०२ मोबाईलपोलिसांनी हस्तगत करून तक्रारदारांना परत केले आहेत. मागील सहा महिने या मोबाईल फोनच्या कामात पोलिसांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावून तक्रारदारांना मोबाईलपरत दिले. पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी तक्रारदारांना मोबाईल परत केले. यावेळी तक्रारदार यांनी पोलिसांचे आभार मानले.
मोबाईल फोन शोधणं आव्हान : पोलिस ठाण्यात किंवा ऑनलाइन तक्रार दिल्यानंतर, तक्रारदार हे मात्र मोबाईल मिळेल अशी आशा सोडून देतात. तर मोबाईल शोधणं पोलिसांन समोर एक आव्हानच असतं. त्यात चोरी झालेले मोबाईल तर थेट बिहार, झारखंड, नेपाळमध्ये गेल्यानं मोबाईल मिळणं तितकसं शक्य होत नाही. त्यामुळं पोलिसांना तांत्रिकदृष्ट्या तपास करून गहाळ झालेले मोबाईल मिळवण्यात थोडेफार यश मिळतं. तर अनेक प्रमाणिक नागरिक देखील स्वतः ला मिळालेला मोबाईल स्थानिक पोलिस ठाण्यात जमा करतात.
१०२ फोन तक्रारदारानं केले परत : काशीमिरा गुन्हे प्रकटीकरण शाखेनं महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे आणि त्यांच्या टीमला एक-दोन नव्हे तर तब्बल १०२ मोबाईल हस्तगत करण्यात यश आलं आहे. या कामगिरीचं पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी देखील कौतुक केलं. शनिवारी काशीमिरा पोलिस ठाण्यात गहाळ झालेले १०२ मोबाईल पोलिसांनी तक्रारदार यांना परत केले आहेत.
हेही वाचा -
- Pune News: मोबाईल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद; ३० लाखांचे मोबाईल केले जप्त
- Two Minors Beating Video Viral : मोबाईल चोरीच्या संशयातून व्यापाऱ्यांची दोन अल्पवयीनांना बेदम मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
- लालबागच्या मिरवणुकीमध्ये 50 हून अधिक गणेश भक्तांचे मोबाईल चोरीला गेल्याची नोंद