महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"पहाटेचा शपथविधी ते बीड प्रकरण"; शिर्डीतील शिबिरात धनंजय मुंडेंचा रोष कोणाकडं? - DHANANJAY MUNDE SHIRDI NCP SHIBIR

शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरात बोलताना मंत्री धनंजय मुंडे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीचाही उल्लेख केला.

Dhananjay Munde
मंत्री धनंजय मुंडे (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 19, 2025, 7:45 PM IST

Updated : Jan 19, 2025, 7:51 PM IST

शिर्डी : "निराधार व बिनबुडाचे कितीही आरोप करून मला अडकवण्याचा प्रयत्न करत असले तरी यश येणार नाही. कारण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे," या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांना ठणकावलं.

चुकीची माहिती देऊन दिशाभूल : "बीड जिल्ह्यातील दुदैर्वी हत्या प्रकरणाआडून महायुतीतील नेत्यांकडूनच मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असल्यानं वाईट वाटतं. याशिवाय जात म्हणून एका समाजाला टार्गेट केलं जात आहे. सातत्यानं आमची मीडिया ट्रायल केली जात आहे. पक्षातील काहीजण दादांच्या कानाला लागून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत," असं म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी खदखद व्यक्त केली. "माझी भूमिका व वस्तुस्थितीची जाणीव असल्याने या कठीण काळातही पक्ष म्हणून दादा माझ्या पाठीशी उभे आहेत. आता त्यांनी बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले याचा आनंदच आहे," असेही मुंडे म्हणाले.

जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवले : "बीड जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात झालेली संतोष देशमुख यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक होती. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावरच लटकवले पाहिजे, हे माझे पहिल्या दिवसापासून स्पष्ट मत आहे. गुन्हेगारी ही एक नीच वृत्ती आहे, त्याला जात धर्म नसतो. मात्र या घटनेच्या आडून जात म्हणून एका समाजाला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवले जात आहे," असं धनंजय मुंडे म्हणाले.

ठरवून टार्गेट केलं : शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरात मुंडे यांनी समारोप कार्यक्रमात हजेरी लावत व्यासपीठावरून आपली भूमिका मांडली. "पक्षात आल्यापासून नेते म्हणून दादांच्या पाठीशी उभे राहिलो. त्यांच्या अंगावर कोणी आले तर त्याला आम्ही शिंगावर घेतलं. पक्षाच्या पडत्या काळात सबंध महाराष्ट्र पिंजून काढला. विधानसभा निवडणुकीत केवळ ५ दिवस पूर्णवेळ परळीत होतो, उर्वरित वेळेत पक्षाच्या अनेक उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा, बैठका घेतल्या. त्यातील बहुतांश उमेदवार निवडून आले, मात्र काही ठिकाणी प्रचाराला गेल्याने मला टार्गेट करण्यात येत आहे. परळीच्या जनतेने एक लाख चाळीस हजार मतांच्या लिडने निवडून दिले, त्याचीच अनेकांना पोटदुखी झाली," असेही मुंडे म्हणाले.

पहाटेची शपथ घेवू नका हे सांगितलं होतं : "२०१९ साली पहाटेची शपथ घेऊ नका, हे षडयंत्र आहे हे मी दादांना सांगितलं होतं. तेव्हापासून त्यांना (अजित पवार) पक्षातून दूर करण्याचं षडयंत्र सुरू झालं. ती शपथ त्यांनी घेतली, पण शिक्षा मात्र मला मिळाली," अशी खंत मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

बीडचा पुण्यासारखा विकास व्हावा : शिबिराला जाण्यापुर्वी माध्यमांशी बोलतांना मुंडेंनी आपल्याला पालकमंत्री पदावरून डावलल्याचा इन्कार केला. "सध्याच्या परिस्थितीत मलाच ती जबाबदारी घेणं योग्य वाटलं नाही. बीडचा पुण्यासारखा विकास व्हावा म्हणून मीच पक्षश्रेष्ठींना व मुख्यमंत्र्यांना अजित पवारांना पालकमंत्री करा, अशी विनंती केली होती," असेही ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. "मला बदनाम करायचंय तर करा, पण बीड जिल्ह्याला..."-धनंजय मुंडे यांचं टीकाकारांना आवाहन
  2. कृषी खरेदी धोरण का बदललं, उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल; धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार ?
  3. अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा होता पण. .: अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?
Last Updated : Jan 19, 2025, 7:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details