मुंबईMedia influencer Sakshi Shivdasani :भारत हा जगातील विविधतेनं परिपूर्ण असा देश आहे. जिथं प्रत्येकाची भाषा, संस्कृतीच वेगळी असून वैशिष्ट्यपूर्णदेखील आहे. तसंच खाण्याच्या सवयीदेखील एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न असल्याचं प्रत्येकाला माहिती आहे. त्यात मुंबई शहराची वेगळी ओळख आहे. ती म्हणजे मुंबईचा प्रसिद्ध 'वडापाव'. मुंबईकरांना 'वडापाव' ही अगदी चटणी सारखी आवश्यक आहे. इतर राज्यांतील नागरिकांनादेखील मुंबईतील वडापावचा आस्वाद नक्कीच घ्यावासा वाटतो. मात्र, अलीकडेच एका सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सरनं 'वडापाव' संदर्भात वक्तव्य केल्यामुळं तिला ट्रोल केलं जातय.
वडापावला म्हणाली कचरा :साक्षी शिवदासानी असं या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं नाव असून ती 'द हॅविंग सेड दॅट शो'मध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिनं "वडापाव हा कचरा असल्याचं म्हटलं. तसंच मी वडापावचा मनापासून तिरस्कार करतो." असं तिनं वक्तव्य केलं होतं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या निवेदकानं विचारलं, मुंबईची आहेस तर, तर तुला वडापाव नक्कीच आवडत असेल. यावर साक्षी म्हणाली "वडापाव कचरा आहे. उकडलेले बटाटे तसंच यातील ब्रेडला काही अर्थ नाही." त्यामुळं मी वडापावचा मनापासून तिरस्कार करते.