मुंबई : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) महायुतीला पूर्ण बहुमत मिळालंय. या निवडणुकीत तब्बल 132 जागांवर विजय मिळवत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनलाय. भाजपाचे दिल्लीतील वरिष्ठ नेते राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी भाजपानं अंतर्गत तयारी सुरू केल्याचंही सांगितलं जातंय. तसंच महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युलादेखील आता जवळपास निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे.
महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपद? - MAHAYUTI GOVERNMENT
एकीकडं मुख्यमंत्री कोण? याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडं महायुतीच्या सत्तावाटपाचं सूत्र ठरल्याचं बोललं जातंय. विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपाला सत्तेत मोठा वाटा मिळण्याची शक्यता आहे.
Published : Nov 28, 2024, 9:30 AM IST
राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची तारीख अद्याप समोर आली नसली तरी हा शपथविधी सोहळा भाजपा भव्यदिव्य करणार असल्याचं म्हटलं जात आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख संघटक आणि भाजपा शासित 13 राज्यांचे मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एका बाजूला भाजपा शपथविधीची अंतर्गत तयारी करत असतानाच दिल्लीत सत्ता वाटपाचा फॉर्म्युलादेखील आता निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे.
कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपद? : मिळालेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत 132 जागांसह भाजपा पूर्ण बहुमतानं निवडून आल्यानं, नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री भाजपाचाच होईल हे आता जवळपास निश्चित झालंय. तर मुख्यमंत्री पदासह भाजपाला 25 मंत्रीपद, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 10 मंत्रिपदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 7 मंत्रीपदे मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. मागील अडीच वर्षांच्या महायुतीच्या सत्ता काळात तिन्ही पक्षांमध्ये सत्तेची समान वाटणी होती. सर्व पक्षांना 9 मंत्रिपदे देण्यात आली होती. मात्र, आता सत्तावाटपाचा फॉर्म्युला बदलला असल्याचं दिसून येते. यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदांमध्ये आणखी घट होण्याची शक्यतादेखील सध्या वर्तवली जात आहे.
हेही वाचा -