महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोलीत सर्वाधिक मतदान, राज्यात मतदानाचे प्रमाण किती?

Maharashtra voting live updates
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Updated : 21 minutes ago

मुंबई:राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. संध्याकाळी 6 वाजता ही मतदान प्रक्रिया संपणार आहे. निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांसारखे प्रमुख नेते आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांनी निवडणूक प्रचारात सहभाग घेतला. महायुतीला सरकार टिकवण्याचं तर महाविकास आघाडीला सत्ता आणण्याचं मोठ आव्हान आहे.

LIVE FEED

11:34 AM, 20 Nov 2024 (IST)

राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.14 टक्के मतदानाचे प्रमाण, गडचिरोलीत सर्वाधिक मतदान

राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.14 टक्के मतदानाचे प्रमाण राहिले आहे. विशेष म्हणजे दुर्गम भागाचे प्रमाण अधिक असलेल्या गडचिरोलीत सर्वाधिक 30 टक्के मतदान झाले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात सकाळी - 11 वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी

01- अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ- 19.57 टक्के

02- शहादा विधानसभा मतदारसंघ- 24.98 टक्के

03- नंदुरबार विधानसभा मतदारसंघ- 17.57 टक्के

04- नवापूर विधानसभा मतदारसंघ- 24.58 टक्के

*जिल्ह्यात एकूण 21.60 टक्के मतदान*

11:32 AM, 20 Nov 2024 (IST)

उद्धव ठाकरे सहकुटुंब पोहोचले मतदान केंद्रात, थोड्याच वेळात मतदार करणार

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे हे वांद्रे पूर्व येथील साहित्य सहवास मतदान केंद्रावर पोहोचले आहेत. ते थोड्याच वेळात मतदान करणार आहेत.

वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार वरुण सरदेसाई रिंगणात आहेत

10:37 AM, 20 Nov 2024 (IST)

पैसे आणि दारू वाटून ते व्होट जिहाद करत आहेत का-नाना पटोले

मुंबई: महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आणि पक्षाचे साकोली येथील उमेदवार नाना पटोले म्हणाले, " काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. राज्यात काँग्रेसला सर्वाधिक मते मिळणार आहेत. विनोद तावडे काल पैसे वाटताना पकडले गेले. भाजप प्रदेशाध्यक्षांना पत्रे वाटण्याची काय सक्ती होती. पैसे आणि दारू वाटून ते व्होट जिहाद करत आहेत का? "

10:16 AM, 20 Nov 2024 (IST)

पुणे जिल्ह्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 5.53 टक्के मतदान

पुणे जिल्ह्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 5.53 टक्के मतदान झाले.

नागपूरमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.86 टक्के मतदान झाले.

मतदानाची टक्केवारी

- हिंगणा - 5.32

- कामठी - 6.71

- काटोल - 5.20

- मध्य - 6.14

- पूर्व - 8.01

- उत्तर - 3.54

- दक्षिण - 8.40

- दक्षिण -पश्चिम - 8.92

- पश्चिम - 7.50

- रामटेक - 6.71

- सावनेर - 7.25

- उमरेड - 8.98

10:08 AM, 20 Nov 2024 (IST)

राज्यात जळगाव, नंदुरबारसह गोंदिया जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी किती?

जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघात सकाळी 7 ते 9 पर्यंतची एकूण अंदाजे सरासरी मतदान टक्केवारी 5.85 टक्के

नंदुरबार जिल्ह्यात एकूण 7.76 टक्के मतदान

1- अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ- 6.52 टक्के

2- शहादा विधानसभा मतदारसंघ- 10.18 टक्के

3- नंदुरबार विधानसभा मतदारसंघ- 6.00 टक्के

4- नवापूर विधानसभा मतदारसंघ- 8.30 टक्के

गोंदिया जिल्ह्यातील 4 विधानसभामध्ये आता पर्यंत 8 टक्के मतदान झालेलं आहे.

9:58 AM, 20 Nov 2024 (IST)

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझा यांनी बजाविला मतदानाचा हक्क

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी, अभिनेत्री जेनेलिया डिझोसा यांनी लातूर येथील मतदान केंद्रावर मतदान केले. रितेश यानं महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच दोन्ही भाऊ ( अमित देशमुख आणि धीरज देशमुख) जिंकणार आहेत, अशा विश्वास व्यक्त केला.

9:41 AM, 20 Nov 2024 (IST)

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत अंदाजे ६.२५ टक्के मतदान

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ०९.०० वाजेपर्यंत अंदाजे ०६.२५ टक्के मतदान झाले आहे.

*विधानसभा मतदारसंघ* *मतदानाची टक्केवारी (अंदाजे)*

१७८धारावी - ०४.७१ टक्के

१७९ सायन-कोळीवाडा - ०६.५२ टक्के

१८० वडाळा – ०६.४४ टक्के

१८१ माहिम – ०८.१४ टक्के

१८२ वरळी – ०३.७८ टक्के

१८३ शिवडी – ०६.१२ टक्के

१८४ भायखळा – ०७ .०९ टक्के

१८५ मलबार हिल – ०८.३१ टक्के

१८६ मुंबादेवी - ०६.३४ टक्के

१८७ कुलाबा - ०५.३५ टक्के

9:16 AM, 20 Nov 2024 (IST)

"विनोद तावडेंना बरीचशी वर्षे ओळखतो, माहितीशिवाय..."-शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष (शरद पवार) शरद पवार म्हणाले, "महाराष्ट्रात नक्कीच सत्ता परिवर्तन होईल. जो योग्य उमेदवार त्यांनाच मतदान करा." भाजपाचे महामंत्री विनोद तावडे यांनी पैसे वाटप केल्याचे आरोप करण्यात आले. त्यावर शरद पवार म्हणाले, " बरीच वर्षे त्यांना ओळखतो. माहितीशिवाय बोलणं योग्य नाही." सुप्रिया सुळे यांच्यावर कथित बिटकॉईन घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले, आरोपी हा तुरुंगात राहिलेला आहे. त्यामुळे फारस महत्त्व देण्याची आवश्यकता नाही."

8:58 AM, 20 Nov 2024 (IST)

सुप्रिया सुळे यांची भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्याविरोधात मानहानीची नोटीस

खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदान केंद्रावर आल्यानंतर कथित क्रिप्टो घोटाळ्याच्या आरोपाबाबत प्रतिक्रिया दिली. खासदार सुळे म्हणाल्या, " खोटे संदेश, व्हाईस नोट्स असल्यानं सायबर क्राईमकडं तक्रार दाखल केली. भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्याविरोधात फौजदारी मानहानीची नोटीस पाठविली आहे. त्रिवेदी यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यास तयार आहे. ते जेव्हा मला कॉल करतील, त्या शहरात, हव्या त्या वृत्तवाहिनीवर येईल. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत."

8:39 AM, 20 Nov 2024 (IST)

निवडणूक आयोगाचा ब्रँड अँबेसिडर सचिन तेंडुलकरनं बजाविला मतदानाचा हक्क

माजी क्रिकेटपटू तथा भारतरत्न सचिन तेंडुलकरनं मुंबईत मतदानाचा हक्क बजाविला. यावेळी संपूर्ण तेंडुलकर कुटुंबीय एकत्र असल्याचं पाहायला मिळालं. तेंडुलकर कुटुंबीयांनी एकत्र मतदान केलं. सचिन तेंडुलकर केंद्रीय निवडणूक आयोगाचा ब्रँड अँबेसिडर आहे. मतदान करण्याचं भारतरत्न तेंडुलकरनं आवाहनं केले.

8:17 AM, 20 Nov 2024 (IST)

जालना विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी कुटुंबासह केले मतदान

जालना विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी आपल्या कुटुंबासह शहरातील भाग्यनगर येथे संस्कार प्रबोधिनी या शाळेत असलेल्या मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

8:14 AM, 20 Nov 2024 (IST)

तुम्ही मतदान केले तर तुम्ही प्रश्न विचारू शकता-शिवसेना नेत्या शायना

मुंबई : शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबादेवी मतदारसंघातील उमेदवार शायना एन.सी. यांनी मतदान हक्क बजाविण्याचे महत्त्व सांगितलं. त्या म्हणाल्या, "मी आमच्या मुंबईतील लोकांना सांगेन, घराबाहेर पडून मतदान करा. तुम्ही मतदान केले तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. पण तुमच्या हातावर मतदानाच्या खुणा असल्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. लोकशाहीच्या या उत्सवात बाहेर पडून आपली नैतिक जबाबदारी पार पाडा."

8:11 AM, 20 Nov 2024 (IST)

अभिनेता अक्षय कुमारनं बजाविला मतदानाचा हक्क

अभिनेता अक्षय कुमारने 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान केले. अक्षय कुमारनं म्हटलं, "मतदान केंद्रावर अत्यंत चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छता ठेवण्यात आलीय. ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत चांगली व्यवस्था करण्यात आली आहे."

7:55 AM, 20 Nov 2024 (IST)

बारामतीची जनता आम्हाला आशीर्वाद देईल -युगेंद्र पवार

बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे (एसपी) उमेदवार युगेंद्र पवार म्हणाले," मला 100 टक्के विश्वास आहे, बारामतीची जनता शरद पवारांना विसरणार नाही. आम्हाला आशीर्वाद देईल."

7:53 AM, 20 Nov 2024 (IST)

अजित पवारांनी मूळ गावात जाऊन बजाविला मतदानाचा हक्क

महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी भोर मतदारसंघात मतदानाचा हक्क बजाविला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मूळ गावी जाऊन मतदान केले.

7:51 AM, 20 Nov 2024 (IST)

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी बजाविला मतदानाचा अधिकार

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे.

7:50 AM, 20 Nov 2024 (IST)

माजी राज्यपाल राम नाईक यांनी पहाडी शाळेत बजाविला मतदानाचा हक्क

भाजपचे ज्येष्ठ नेते उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी गोरेगाव पहाडी शाळेत मतदानाचा हक्क बजावला.

Last Updated : 21 minutes ago

ABOUT THE AUTHOR

...view details