महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चला चला निवडणूक आली, शस्त्रास्त्रं जमा करण्याची वेळ झाली; 7391 पैकी 4734 परवानाधारक शस्त्रं जमा

भारतीय निवडणूक आयोगाकडून शस्त्रास्त्रांबाबत तसंच कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2024, 10:48 PM IST

ठाणे :निवडणूक आली की प्रशासनाची लगबग सुरू होते. आता विधानसभा निवडणूक निर्भिड वातावरणात पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झालं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 4 हजार 734 परवानाधारक शस्त्रं जमा केली आहेत. तर, 352 शस्त्रास्त्रे अद्याप जमा करणं बाकी आहे.

अनुचित घटना घडू नये म्हणून खबरदारी : भारतीय निवडणूक आयोगाकडून शस्त्रास्त्रांबाबत तसंच कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले आहेत. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून शस्त्रास्त्रे बाळगण्यास निर्बंध घालण्याबाबतच्या सूचना निवडणुक आयोगाकडून करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, निवडणूक काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, म्हणून पोलीस विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

कारवाई सुरू : ठाणे शहर आयुक्तालय क्षेत्रातील आणि ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रातील सर्व शस्त्र परवानाधारकांची शस्त्रं जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, बँका, महत्वाची कार्यालयं, संस्था, विद्युत केंद्र, सराफी केंद्रं व इतर महत्वाच्या कार्यालयांची शस्त्र वगळून सर्व परवानाधारक शस्त्रे जमा करण्याचे आदेश संबंधित झोनच्या पोलीस उपायुक्तांना देण्यात आले असून शस्त्रे जमा करण्याची कारवाई सुरू आहे.

4 हजार 734 शस्त्रास्त्रं जमा :ठाणे जिल्ह्यात एकूण 7 हजार 391 शस्त्र परवानाधारक आहेत. आतापर्यंत 4 हजार 734 शस्त्रास्त्रं जमा करण्यात आली आहेत. ज्यांचा कुठलाही अतापता सापडत नसलेल्या तसंच पोलीस अहवालातील वादग्रस्त असलेल्या 54 शस्त्र धारकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तर अद्यापही 353 शस्त्रं जमा करणं बाकी असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.

हेही वाचा

  1. "महाराष्ट्रात महाविकास आघाडी नव्हे तर, महाअनाडी आघाडी", योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर घणाघात
  2. कराड उत्तरची भाकरी फिरवा, २५ वर्षांचा बॅकलॉग भरून काढतो; देवेंद्र फडणवीसांची गॅरंटी
  3. निवडणुकीनंतर राज ठाकरे भाजपासोबत येणार का?; प्रवीण दरेकर म्हणाले राजकारणात कोणीही...

ABOUT THE AUTHOR

...view details