महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकसभा निवडणूक 2024 : 3000 शतकपार वयोवृद्ध मतदारांचा कौल कुणाला याची उत्सुकता... - Thane Lok Sabha Constituency

Lok Sabha Elections : पुढील महिन्यात देशभरात लोकसभा निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केलीय. असं असतानाच जनतेचा कौल कुणाकडं असणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात 3000 शतकपार वयोवृद्ध मतदारांचा कौल कुणाला आहे? यासंदर्भात आपण जाणून घेऊया.

Lok Sabha Elections 3000 voters more than 100 aged to whom they will vote for in Thane
लोकसभा निवडणूक 2024 : 3000 शतकपार वयोवृद्ध मतदारांचा कौल कुणाला? पाहा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 7:33 PM IST

ठाणे Lok Sabha Elections : लोकशाहीचा महोत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी की गॅरंटी विरुद्ध काॅंग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा या आश्वासनांच्या रस्सीखेचमध्ये यंदा 18 ते 19 वयोगटातील नवमतदाराबरोबरच वय 85 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयोमान असलेल्या, तसंच विशेष करून शतकपार वयोवृद्ध मतदारांचा कौल कुणाला मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


3000 मतदार शतकपार : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण आणि ठाणे या तीन लोकसभा मतदारसंघा अंतर्गत 18 विधानसभा मतदारसंघात शतकपार गाठलेल्या वयोवृद्ध मतदारांची एकूण संख्या ही 3 हजार 168 एवढी आहे. यापैकी वय वर्षे 100 ते 109 मध्ये 3 हजार 133, तर 110 ते 119 वयोगटात 20, आणि 120 वयोमान पार केलेल्या मतदारांची संख्या 15 इतकी आहे. तसंच शंभरी पार केलेले एकूण पुरुष मतदार 1 हजार 662 तर, 1 हजार 506 महिला मतदार आपला मतदानाचा हक्क घरून बजावणार असल्याची माहिती ठाणे उप-जिल्हाधिकारी अर्चना कदम यांनी दिली आहे.


1 लाख अर्जांचं वाटप : सद्यस्थितीत आठवडाभरापासून या व्यक्तींना घरोघरी जाऊन 12 डी हा अर्ज, घरुन मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वाटप करण्यात येत आहे. आतापर्यंत 1 लाख 77 हजार अर्जांचं वाटप करण्यात आलं आलंय. या संपूर्ण निवडणूक अर्ज वाटप प्रक्रियेवेळी प्रत्यक्षात या वयोगटातील मतदारांचा आकडा वाढू शकतो किंवा संबंधित व्यक्ती मयत असेल तर एखाद दुसरी संख्या कमी देखील होऊ शकते असंही प्रशासनाने सांगितलं.


लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच स्थानिक पातळीवरील जिल्हा तसंच महापालिका निवडणूक यंत्रणेच्या कामाला गती मिळाली आहे. या निवडणुकीत दिव्यांग आणि 85 वर्षांवरील वयोवृद्ध मतदारांना घरून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील एकूण मतदारांची संख्या ही 1 लाख 25 हजार 867 एवढी आहे. यापैकी शंभरी ओलांडलेल्या वयोवृद्ध मतदारांची संख्या अडीच टक्के इतकी आहे. तर 145 क्रमांक मीरा भाईंदर या विधानसभा मतदारसंघात 100 ते 109 या वयोगटात सगळ्यात जास्त म्हणजे 141 इतक्या महिला तर डोंबिवली मतदार संघात 162 एवढ्या वयोवृद्ध मतदारांची संख्या नोंदविण्यात आली आहे. त्यामुळं नवमतदारांसोबत शतकपार केलेल्या वयोवृद्ध मतदारांचा कौल ज्यांना मिळेल त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर होणार हे निश्चित.

हेही वाचा-

  1. अमरावती लोकसभा निवडणूक : आमच्या समोर सर्व पर्याय खुले; अभिजीत अडसूळ यांचा गर्भित इशारा - Amravati Lok Sabha Elections
  2. सरपंच ते आमदार : अमरावतीत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडेंचा असा आहे राजकीय प्रवास - Lok Sabha Election 2024
  3. नाशिक लोकसभा मतदार संघातून चार बाबा निवडणूक लढण्यास इच्छुक - Trimbakeshwar Akhara Parishad

ABOUT THE AUTHOR

...view details