मुंबई Laila Khan Murder Case : बॉलीवुड अभिनेत्री लैला खान हिच्या हत्येप्रकरणी तिचे सावत्र वडील परवेज टाक याला मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यामध्ये आज शिक्षा ठोठावण्यात आली. परवेजला भा.दं.वि. कलम 302 अन्वये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर कलम 201 अन्वये सात वर्षांचा सश्रम कारावास व 10 हजार दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्षांचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली.
काय झाला युक्तिवाद? :खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील पंकज रामचंद्र चव्हाण यांनी बाजू मांडली. परवेज याला ऑर्थर रोड कारागृहात अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. निकालावेळी न्यायालयात त्याचे आई वडिल पत्नी आणि तीन मुली उपस्थित होते. लैला खान हिच्यासहित तिची चार भावंडे आणि आईची 2011 मध्ये हत्या झाली होती. सुपरस्टार राजेश खन्नासोबत तिने एका हिंदी चित्रपटात काम केले होते.
- परवेज विरोधात हत्या करणे, हत्येचा कट रचणे, पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यामध्ये त्याला दोषी ठरवण्यात आले होते. नाशिकजवळील इगतपुरी येथील लैलाच्या बंगल्यावर या हत्या झाल्याचा आरोप होता.
या चित्रपटात केले होते काम -मालमत्तेवरुन झालेल्या वादानंतर या हत्या करण्यात आल्या होत्या. परवेज हा लैलाची आई शेलिनाचा तिसरा पती होता. लैला खानचा विवाह मुनीर खान याच्याशी झाला होता. मुनीर हा ‘हरकत-उल-जिहाद अल इस्लामी’ या बंदी असलेल्या बांगलादेशी संघटनेचा सदस्य होता, अशी चर्चा होती. त्यामुळे त्यावेळी या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले होते. 2002 मध्ये लैला खान हिने कन्नड चित्रपटाद्वारे करिअर सुरू केले होते. लैला खाननं 2008 मध्ये वफा-अ डेडली लव स्टोरी यामध्ये काम केले होते. हत्येपूर्वी ती जिन्नात या चित्रपटात काम करत होती. 2011 मध्ये लैलाचे सख्खे वडील असलेल्या नादिर पटेल यांनी त्याच्या परिवारातील व्यक्ती गायब असल्याची तक्रार मुंबईतील ओशिवरा पोलिस स्थानकात दाखल केली होती. आसिफ शेख व परवेज टाकवर त्यांनी संशय व्यक्त केला होता.