महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जगात भारी कोल्हापुरी! एकीकडं देशात प्रार्थानास्थळावरुन वाद सुरु असताना कोल्हापुरकरांनी देशासमोर घालून दिला नवा आदर्श

Kolhapur Masjid Issue : देशात सध्या एकीकडं प्रार्थनास्थळावरुन वाद सुरु असताना कोल्हापूरकरांनी देशासमोर नवा आदर्श घालून दिलाय. शहरातील लक्षतीर्थ वसाहतीमधील वादग्रस्त प्रार्थनास्थळ आज संबंधितांनी स्वतःहून काढून घेतलं.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2024, 10:22 PM IST

कोल्हापूर Kolhapur Masjid Issue : बेकायदेशीर बांधकामामुळं दोन समाजात तणाव तसंच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेलं लक्षतीर्थ वसाहतीमधील ते वादग्रस्त प्रार्थनास्थळ अखेर आज सकाळपासून संबंधितांकडून स्वतः हून काढण्यास सुरुवात केली. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला तणाव निवळल्याचं दिसून आलं. दरम्यान आज दुसऱ्या दिवशीही शहरात ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दिवसभर शहरात तणावपूर्ण वातावरण : बेकादेशीर बांधकाम असल्यानं संबंधित प्रार्थनास्थळ हटवण्याबाबत गेल्या दोन-तीन आठवड्यापूर्वी वाद निर्माण झाला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं. इथंही संबंधित बांधकाम हटवण्याबाबत मनाई आदेश देण्यास न्यायालयानं नामंजूर केल्यानं बुधवारी सकाळी महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या यंत्रणेसह बांधकाम हटवण्यास गेले होते. यावेळी संबंधित स्थानिक नागरिकांकडून याला विरोध करण्यात आला. तसंच रास्ता रोको आणि महानगरपालिकेला घेराव घालून आंदोलन करण्यात आलं. यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटनाही आक्रमक झाल्यानं शहरात दिवसभर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळं जिल्हाधिकारी यांच्यासमोर झालेल्या दोन्ही समाजाच्या बैठकीत अखेर संबंधितांकडून स्वतःहून हे अनाधिकृत प्रार्थना स्थळाचं बांधकाम काढण्याची मागणी करण्यात आली. त्यांच्या धार्मिक भावनेचा विचार करुन, जिल्हाधिकाऱ्याकडून त्यांना स्वतः बेकायदेशीर बांधकाम उतरण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळपासूनच संबंधितांकडून हे बेकायदेशीर बांधकाम हटविण्यास सुरुवात करण्यात आली होती.

संवेदनशील भागात पोलिसांचा खडा पहारा : बुधवारी कोल्हापूर शहरात घडलेल्या प्रकारानंतर शहरातील ऐतिहासिक दसरा चौकाजवळील मुस्लिम बोर्डिंग, अकबर मोहल्ला, छत्रपती शिवाजी चौक या संवेदनशील परिसरात जिल्हा पोलीस दलाच्यावतीनं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज असल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलंय. एकीकडं देशात प्रार्थानास्थळावरुन वाद होत असताना कोल्हापुरकरांनी केलेल्या या कृतीमुळं देशासमोर नवा आदर्श घालून दिलाय.

हेही वाचा :

  1. कोल्हापूर वादग्रस्त बांधकाम पाडताना तणाव; शालेय बसवर समाजकंटकांनी केली दगडफेक
  2. मराठमोळा रांगोळी कलाकार पोहोचला थेट अयोध्येत; आकर्षक रांगोळ्यांची रामभक्तांना भुरळ

ABOUT THE AUTHOR

...view details