महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्गसह रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट; मुसळधार पावसाचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर - Ratnagiri Weather Forecast - RATNAGIRI WEATHER FORECAST

Ratnagiri Rain Updates : रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस सुरू असून खबरदारीसाठी आज (8 जुलै) शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Orange alert in Ratnagiri warning of heavy rain, today holiday announced for schools and colleges
रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट (Source reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 8, 2024, 12:55 PM IST

Updated : Jul 8, 2024, 1:14 PM IST

रत्नागिरी Ratnagiri Rain Updates : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुफान पर्जन्यवृष्टी सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनानं महाविद्यालय आणि शाळांना आज (8 जुलै) सुट्टी जाहीर केली आहे. तसंच जगबुडी, कोदवली नदी इशारा पातळीच्यावर असून आजही मुसळधार पाऊस होऊ शकतो. हवामान विभागानं आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय.

रत्नागिरीत मुसळधार पाऊस (Source reporter)
चिपळूणमध्ये प्रशासन सतर्क, रात्री केली नदीकाठाच्या भागाची पाहणी : चिपळूणमध्ये वाशिष्टी नदीपात्रातील पाण्यात रविवारी (7 जुलै) रात्री सातत्यानं वाढ होत होती. त्यामुळं प्रशासनदेखील अलर्ट मोडवर आहे. चिपळूण पोलीस आणि महसूल प्रशासनाबरोबरच चिपळूण मध्ये दाखल झालेल्या NDRF च्या टीमनं नदी काठाच्या भागाची रात्री पाहणी केली. यावेळी पाणीपातळीचा अंदाज घेण्यात आला. सध्या पाणी ओसरलं असलं तरी, धोका मात्र कायम आहे. त्यामुळं प्रशासनही अलर्ट मोडवर आहे.
शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयातील (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना आज सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिला. आदेशात म्हटलंय की, प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून जिल्ह्यातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून प्रदान करण्यात आले आहेत. आपती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत.


पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता : हवामान विभागानं दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय. खेड तालुक्यातील जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली आहे. संगमेश्वर येथील शास्त्री आणि बावनदी, लांजा येथील मुचकुंदी आणि काजळी नदी, राजापूर येथील कोदवली नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळं जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा -

  1. पुढील 24 तासांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी - Maharashtra Weather Forecast
  2. पुढील पाच दिवस 'या' भागाला ऑरेंज अलर्ट, तर विदर्भासह पालघर जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता - Maharashtra Weather Update
  3. मुंबईत सहा तासात 300 मिलिमीटर पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर - Mumbai Rain
Last Updated : Jul 8, 2024, 1:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details