महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निळजे पुलाच्या कामासाठी कल्याण-शीळ फाटा रोड पाच दिवसासांठी होणार बंद - NILJE BRIDGE WORK

रेल्वे विभागाच्या डीएफसीसी महत्त्वाच्या प्रकल्पांतर्गत पलावा जंक्शनकडे जाणाऱ्या वाहिनीवर निळजे ओव्हर ब्रिजही वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Kalyan-Shilphata road to be closed for five days
कल्याण-शीळ फाटा रोड पाच दिवसासांठी बंद (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2025, 7:05 PM IST

ठाणे-कल्याणमधीलनिळजे ओव्हर ब्रिजच्या पुनर्बांधणीचे काम 5 फेब्रुवारी रात्री 12 वाजल्यापासून ते 10 फेब्रुवारी 2025 रात्री 12 वाजेपर्यंत होणार आहे. त्यामुळं कल्याण निळजे रेल्वे विभागाकडून रेल्वे ब्रिजचे काम करण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिलीय. रेल्वे विभागाच्या डीएफसीसी महत्त्वाच्या प्रकल्पांतर्गत पलावा जंक्शनकडे जाणाऱ्या वाहिनीवर निळजे ओव्हर ब्रिजही वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

वाहतूक विभागाकडून पर्यायी मार्गांचा वापर :मुंबईकडे जाणाऱ्या निळजे ब्रिजचे काम करण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले असून, कल्याण शीळफाट्याकडे जाणाऱ्या ब्रिजवरून हलकी वाहने म्हणजेच बस जाऊ शकतात, मात्र एकेरी मार्ग असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक विभागाने पर्यायी मार्गांचा वापर करण्यासाठी सूचना केल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिलीय. ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हलक्या अन् जड वाहनांनी डोंबिवली मोठागाव खाडीवरून नाशिक महामार्गाचा वापर करावा, लोढा पलावा जंक्शन मार्गाने नवी मुंबई, मुंबई दिशेने वाहनांनी तळोजा एमआयडीसीमार्गे पुढे जाण्यासाठी वाहन चालकांनी या मार्गाचा वापर करावा, इतर हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या वाहनांनी कटाई नाका ते लोढा पलावा जंक्शनकडे जाणाऱ्या वाहनांनी विरुद्ध दिशेने आपली वाहने चालवावीत.

माणकोली ब्रिजवरून वाहतुकीला उबाठा गटाचा विरोध :हलक्या वाहनांबरोबर बस हे वाहन कटाई नाका ते लोढा पलावा या मार्गावर जाऊ शकतात, मात्र ही वाहतूक एकेरी असणार आहे. त्याचप्रमाणे या मार्गावर जड वाहनांना टेम्पो, ट्रक, मालवाहू गाडी, सहा चाकी टेम्पो अन् ट्रक अशा वाहनाना प्रवेश बंद असणार असल्याचे माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिलीय. कल्याण निळजे रेल्वे विभागाकडून रेल्वे ब्रिजचे काम करण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आलाय. मुंबईकडे जाणाऱ्या निळजे ब्रिजचे काम करण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आलेत. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक विभागाने पर्यायी मार्गांचा वापर करण्यासाठी सूचना केल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिलीय. मात्र या वाहतूक बदलाचा विरोध उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केलाय.

डोंबिवली मोठागाव खाडीवरून नाशिक महामार्गाचा वापर : ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हलक्या अन् जड वाहनांनी डोंबिवली मोठागाव खाडीवरून नाशिक महामार्गाचा वापर करावा, अशी सूचना वाहतूक पोलिसांनी केलीय. मात्र दिपेश म्हात्रे यांनी विरोध दर्शवलाय. नियोजनाशिवाय मोठागाव मानकोली पुलावरून वाहतूक होऊ देणार नाही, मानकोली पुलावरून वाहतूक सुरू झाली तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिलाय.

हेही वाचा :

  1. लहानपणी राजकीय हस्तक्षेप होत होते; अलीकडचा काळ हे स्पर्धेचे युग; अजित पवारांचं वक्तव्य
  2. 'महायुती किंवा स्वबळावर, आमची...'; साताऱ्यातील अजितदादांच्या खासदारानं स्पष्टच सांगितलं

ABOUT THE AUTHOR

...view details