ठाणे jyeshtha Gauri Pujan 2024 : ठाण्यातील चंदनी कोळीवाडा परिसरामध्ये अनोख्या प्रकारे गौरीला नैवेद्य देण्याची प्रथा आहे. ही प्रथा जवळपास 107 वर्षांपासून सुरू असून या गौरीला मासे, खेकडे, सुरमईचा नैवेद्य दिला जातो. देशभरात गणेशोत्सव काळात कोळी समाजातील (koli Community) या परंपरेला सुरूवात झाली.
कोळीवाड्यातील गौरीला माशांचा नैवेद्य (ETV BHARAT Reporter) तिखट नैवेद्य देण्याची प्रथा :कोळी समाजातील गाणी, फुगड्या घालून गौरी, गणेशाचा उत्सव साजरा केला जातो. मात्र, संपूर्ण कोळीवाड्यात तिखट नैवेद्य देण्याची प्रथा आहे. या नैवेद्यात मासे असतात. आधी निवटा हा मासा दिला जात होता. मात्र, आता तो कमी प्रमाणात मिळतो म्हणून खेकडे आणि इतर मासे नैवेद्याला असतात. गणेशोत्सवात शुद्ध शाकाहारी जेवणाची प्रथा आहे. मात्र, कोळी समजाची ही अनोखी प्रथा समजली जाते.
कोळीवाड्यातील ही मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची प्रथा जपण्याचा प्रयत्न आम्ही अनेक वर्षापासून करत आहोत. आमच्या कुटुंबात जवळपास 300 सदस्य असून दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त आम्ही एकत्र येत असतो. - लक्ष्मी कोळी
तिखट जेवणाचा नैवद्य :कोळीवाड्यातील कोळी कुटुंबीयांनी आज गौरीचं पूजन केलं. दरवर्षी गणेशोत्सव आणि गौरी पूजेसाठी कोळी कुटुंब एकत्र येऊन रात्रभर जागत गौरीची सजावट करतात. आज कोळी कुटुंबातील महिलांनी आपल्या गणरायाला गोड जेवणाचा नैवद्य तर गौराईला तिखट जेवणाचा नैवद्य दाखवला. दाखवलेल्या नैवेद्यात खेकड्याचं कालवण, मासे, निवटे, कोंबडीवडे, भाकरी, भात अशा अनेक मांसाहारी खाद्यपदार्थांचा समावेश आहे.
उद्या बाप्पाला आणि गौराईला निरोप :कोळी कुटुंबीय हा सण पिढ्यानपिढ्या मोठ्या उत्साहात एकत्रित येऊन साजरा करतात. या परंपरेला 107 वर्षे पूर्ण झाली आहेत. उद्या बाप्पाला आणि गौराईला निरोप देण्यात येणार असल्यानं, आज कोळी कुटुंबीय गौराई आणि आपल्या लाडक्या बाप्पासाठी जागरण करुन पारंपरिक पद्धतीचं नृत्य, गाणी, खेळ सादर करणार आहेत.
हेही वाचा -
गौराई घेणार पाहुणचार; 'अशी' आहे गौरीपूजनाची प्रथा, तर गौरी विसर्जनासाठी 'हा' आहे शुभ मुहूर्त - Mahalaxmi Gauri Pujan 2024