महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंब्र्यात ईदच्या जुलूसमध्ये फडकले पॅलेस्टाईनचे झेंडे; जितेंद्र आव्हाड यांची भन्नाट प्रतिक्रिया - Palestine Flag

Palestine Flag : मुंब्र्यात बुधवारी ईद-ए-मिलादचा जुलूस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परंतु, जुलूसमध्ये पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड (संग्रहित छायाचित्र)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2024, 9:59 PM IST

ठाणेPalestine Flag : देशभरासह मुंबई ठाण्यामध्ये ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुंब्र्यात देखील मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा होत असताना त्यावेळी निघालेल्या जुलूसमध्ये पॅलेस्टाईनी झेंडे (Palestine Flag) फडकवण्याचा प्रकार घडला आहे. पॅलेस्टाईन देशावरती अन्याय होण्याच्या घटना घडल्यानंतर मुंब्रामध्ये ईद-ए-मिलाद सणाच्या निमित्ताने झेंडे फडकवून त्यांना समर्थन असल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळालं.

मुंब्रामध्ये वादग्रस्त विधान : मागील काही दिवसापासून मुंबईमध्ये देशाबाहेर होणाऱ्या घटनांचा निषेध केला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन अनेक मुस्लिम संघटना येथे कार्यरत आहेत. त्यांच्याकडून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये यासाठी मुंब्रा येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतो. मात्र, तरी देखील वादग्रस्त विधान मुंब्रामध्ये करण्यात येतात आणि या ठिकाणचे वातावरण बिघडते अशी अनेक उदाहरणे आहेत.

जुलूसमध्ये फडकले फिलिस्तीन झेंडे (ETV BHARAT Reporter)



लहान मुलांनी फडकवले झेंडे: मुंबईतील दोन-तीन तरुण मुलांनी हे झेंडे फडकवण्याचं काम केलं. मुंब्रा पोलिसांनी लगेच हे झेंडे जप्त करून त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळं गुन्हा दाखल केला नाही. मात्र अधिकचा तपास चालू आहे. तर मुंब्रामध्ये जे झेंडा फडकवण्याचे प्रकार झाले हे दोन-तीन लहान मुलांनी केले आहेत. तिथे लहान मुलं काहीही करत असतात अशी प्रतिक्रिया, आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

2023 मध्ये स्टेडियममध्ये पॅलेस्टाईनचे झेंडे आणले होते : या आधीही असाच एक प्रकार घडला होता. जगप्रसिद्ध ईडन गार्डन्स स्टेडियमवर क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सामना रंगला होता. यावेळी स्टेडियममध्ये पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवण्यात आले होते. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

ABOUT THE AUTHOR

...view details