महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव 'हिट अँड रन'; भरधाव कारची महिला आणि बाईकला धडक, पाहा थरारक सीसीटीव्ही - Jalgaon Hit and Run Case CCTV - JALGAON HIT AND RUN CASE CCTV

Jalgaon Hit and Run Case CCTV : जळगाव 'हिट अँड रन प्रकरणाचा' सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय. एका भरधाव कारने दुचाकीस्वार आणि पायी जाणाऱ्या महिलेला जोरात धडक दिली. यात तिघेजण जखमी झाले.

Jalgaon hit and run case
भरधाव कारनं दिली महिलेला धडक (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 13, 2024, 11:41 AM IST

Updated : Aug 13, 2024, 11:50 AM IST

जळगाव Jalgaon Hit and Run Case CCTV :राज्यात ‘हिट अँड रन’ प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता जळगाव तालुक्यात रविवार (११ ऑगस्ट रोजी) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ‘हिट अँड रन’ ची घटना समोर आली. एका भरधाव कारने दुचाकीस्वार आणि पायी जाणाऱ्या महिलेला जोरात धडक दिली. त्यानंतर कार पलटी झाल्याने कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले. या अपघाताचा सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आज समोर आला आहे.

भरधाव कारनं दिली महिलेला धडक (ETV Bharat Reporter)

धडक दिल्यानंतर कार उलटली :कृष्णा पिंगळे (वय वर्ष २० रा. गाडगेबाबा चौक, जळगाव), मयंक राजेंद्र चौधरी वय २१, रा. गणेशवाडी, जळगाव) आदित्य अनिल बिऱ्हाडे (वय २० वर्ष, रा. हरीविठ्ठल नगर,जळगाव) या तिघांसह जय पाटील (वय २०) आणि लोकेश राजपूत (वय २१, दोन्ही रा. जळगाव) हे पाच जण कारनं (एम एच १५ सीडी ८१९४) पद्मालय येथे गेले होते. जळगावला परत येताना एका वाहनाला कारचा कट लागला. वाहन चालकानं कार थांबवली. मात्र, त्या ठिकाणी जमाव जमू लागल्यांनतर कारमधील कृष्णा पिंगळे, मयंक चौधरी, कृष्णा पिंगळे, मयंक चौधरी, आदित्य बिऱ्हाडे हे तिघेजण घाबरल्याने त्यांनी कार वावडद्याच्या दिशेने भरधाव नेली. त्यानंतर वावडला चौफुलीवर एका महिलेला उडवलं. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.

कारची जोरदार धडक :या घटनेत कारमधील तिघे मयंक चौधरी, कृष्णा पिंगळे आणि आदित्य बिऱ्हाडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना संतप्त जमावानं बाहेर काढलं. यात ज्या दुचाकीला धडक दिली. त्या दुचाकीवरील हिरामण उर्फ पप्पू कदम राठोड (वय ३० रा. रामदेव वाडी) हा देखील जबर जखमी झाला आहे. दरम्यान कारमधील तिघांना बाहेर काढल्यावर काहींनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परंतु इतर ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीनं त्यांना आणि जखमी दुचाकीस्वाराला शासकीय रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले.

हेही वाचा

  1. वरळी हिट अँड रन प्रकरणात नवा ट्विस्ट, मिहीर शाहचा अल्कोहोल रिपोर्ट आला निगेटिव्ह - Worli hit and run case
  2. वरळीनंतर मुलुंड येथे हिट अँड रन: ऑडीने रिक्षाला दिली जोरदार धडक, चारजण जखमी - Mulund Hit And Run Case
  3. वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शाहला न्यायालयीन कोठडी - Worli Hit and Run Case
Last Updated : Aug 13, 2024, 11:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details