मुंबई :The Indrani Mukherjee Story: Buried Truth : नेटफ्लिक्स या मनोरंजन प्लॅटफॉर्मवर (दि. 23 फेब्रुवारी) रोजी इंद्राणी मुखर्जीच्या संदर्भातील माहितीपट ''द इंद्राणी मुखर्जी या स्टोरी : बरीड ट्रुथ" दाखवला जाणार आहे. मात्र, त्यामध्ये शीना बोरा खून प्रकरणात काही व्यक्ती संबंधात त्यात माहिती आहे. त्या माहितीपटाला स्थगिती द्यावी, अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली होती. त्या खटल्याबाबत आज विशेष न्यायालयात सुनावणी झाली असता न्यायमूर्तींनी सीबीआयची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे नेटफ्लिक्सवरील हा माहितीपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला.
सीबीआय निरुत्तर झाली : शीना बोरा या मुलीचा खून झाला, त्या खुनाच्या संदर्भात तिची सावत्र आई इंद्राणी मुखर्जी ही आरोपी आहे. त्यांच्या संदर्भातील खटला विशेष न्यायालयात सुरू आहे. नेटफ्लिक्सवर इंद्राणी मुखर्जी यांच्या संदर्भातील माहितीपट (दि. 23 फेब्रुवारी 2024) रोजी प्रसारित होणार होता. परंतु, आरोपींशी संबंधित काही बाबी या माहितीपटात असल्यामुळे त्याला स्थगिती मिळावी, अशी मागणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं मुंबईच्या विशेष न्यायालयात केली होती. मात्र, इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजीत सांगळे यांनी हे सीबीआयकडून देण्यात आलेले आव्हान कोणत्या कायद्याच्या तरतुदीच्या आधारे आहे? हे सीबीआयनं सांगावं असा प्रश्न न्यायालयात विचारला. यावर सीबीआयचे वकील निरुत्तर झाले. त्यामुळे न्यायालयाने सीबीआयची याचिका फेटाळून लावली आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मवरून माहितीपट होणार प्रसारित : शीना बोरा ही 24 वर्षाची होती. तेव्हा तिचा खून करण्यात आला होता. तिचा मृतदेह हा इंद्राणी मुखर्जींच्या गाडीचा ड्रायव्हर शामवर राय यानं रायगडला नेला होता. त्यामुळे इंद्राणी मुखर्जी आणि तिचा ड्रायव्हर तसंच इंद्राणी मुखर्जीचा पहिला नवरा संजीव खन्ना यांचादेखील यात सहभाग असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या संदर्भाचा खटला मुंबई विशेष सीबीआय न्यायालयात सुरू आहे. इंद्राणी मुखर्जीच्या संदर्भात नेटफ्लिक्स या मनोरंजन प्लॅटफॉर्मवरून माहितीपट प्रसारित होणार होता. यासंदर्भात इंद्राणी मुखर्जींचा वकील त्यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं दाखल केलेल्या याचिकेवच प्रश्नचिन्ह केलं आहे.
नेटफ्लिक्सच्या माहितीपटाला अडथळा नाही : दोन्ही पक्षकारांचे मुद्दे ऐकल्यानंतर न्यायालयानं ही याचिका मेंटेनेबल नाही. या न्यायालयात ती दाखल होऊ शकत नाही. तिला कायदेशीर आधार नाही, असं म्हणत न्यायालयाने ती फेटाळून लावली. त्यामुळे इंद्राणी मुखर्जी संदर्भातील प्रसारित होणाऱ्या (दि. 23 फेब्रुवारी 2024) नेटफ्लिक्सवरील माहितीपटाला आता कोणताही लगाम नाही. सीबीआय आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार काय? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.