महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू (Source - ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2024, 6:37 PM IST

Updated : Nov 20, 2024, 6:48 PM IST

बीड :बीड विधानसभा मतदारसंघात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला. बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली पडले. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यामुळं बीड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बाळासाहेब शिंदे हे बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीनं संदीप क्षीरसागर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं योगेश क्षीरसागर हे तगडे उमेदवार मैदानात आहेत. या व्यतिरिक्त ज्योती मेटे या देखील या निवडणुकीत आव्हान देत आहेत. याच मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून बाळासाहेब शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

चक्कर आली अन् खाली पडले :बाळसाहेब शिंदे हे मतदान केंद्राचा आढावा घेत होते. यासाठीच ते बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर थांबले होते. मात्र, या दरम्यान त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. त्यांना बीड शहरातील काकु नाना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानतंर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

हेही वाचा

  1. आम्ही जॅकेट आणि हेल्मेट घालून फिरायचं का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
  2. निवडणुकीत प्रादेशिक पक्षाचा बोलबाला असेल, प्रकाश आंबेडकर यांचा दावा
  3. सरकार महायुतीचंच येणार अन् मुख्यमंत्री भाजपाचा; नवनीत राणांना विश्वास
Last Updated : Nov 20, 2024, 6:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details