हैदराबाद PAN-Aadhaar linking : आयकर विभागानं पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्यासंबंधात महत्त्वाची सूचना जारी केली आहे. ज्यांचं पॅनकॉर्ड आधार कार्डशी लिंक नसेल त्यांनी 31 मेपूर्वी दोन्ही कार्डची जोडणी करा. अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. आयकर विभागानं अधिकृतपणे ट्विट करत ही माहिती दिली आहे.
आयकर विभागामार्फत वारंवार आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्याबाबद सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही अनेक नागरिकांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळं आयकर विभागानं 'एक्स' सोशल मिडियावर पोस्ट करत नागरिकांना आठवण करुन दिली आहे. 31 मे 2024 रोजीपूर्वी दोन्ही कार्ड लिंक करणे बंधनकारक आहे. अन्यथा तुम्हाला उत्पन्नावर दुप्पट टीडीएस द्यावा लागेल.
काय केलंय ट्विट?:आयकर विभागानं नागरिकांना रिमांडर म्हणून पुन्हा ट्वीट करत ही माहिती दिली. करदात्यांनी 31 मेपूर्वी पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करावी अन्यथा आयकर कायदा कलम 1961 च्या कलम 206एए आणि 206 सीसी अंतर्गत दंडाला समोरं जावं लागंल, असं ट्विट आयकर विभागामार्फत करण्यात आलं आहे.
लिंक आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी हे करा
पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक आहे की नाही याविषयी शंका असेल, तर आपण घरबसल्या सोप्या पद्धतीने स्टेट्स चेक करू शकता. दोन पद्धतीनं तुम्ही स्टेटस् बघू शकता.
पहिली पद्धत :तुम्ही आयकर विभागाच्या ई-फायलिंग या पोर्टलवर जा. त्यासाठी तुम्हाला
- स्टेप 1: सर्वात आधी, आयकर विभागाच्या ई-फायलिंग या पोर्टलवर जावे. त्यासाठी तुम्हाला https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या लिंकवर क्लिक करावं लागेल.
- स्टेप 2: यानंतर 10 आकड्याचा पॅन क्रमांक आणि 12 आकडी आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर व्ह्यू लिंकवर जाऊन आधार स्टेटवर क्लिक करा.
- स्टेप 3: व्ह्यू लिंकवर आधार स्टेट्सवर क्लिक केल्यास आधार क्रमांक दिसेल अन्यथा तुम्हाला लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
तुमचा आधार क्रमांक अगोदरच लिंक असेल तर आधार क्रमांक दिसेल. अन्यथा तर तुम्हाला लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
दुसरी पद्धत : एसएमएस वर करा चेंक
आयकर विभागामार्फत एसएमएसच्या माध्यमातून देखील लिकिंग स्टेट्स चेक करता येणार आहे. याकरिता आयकर विभागानं 567678 अथवा 56161 नंबर दिले आहे. या क्रमांकावर UIDPAN <12 अंकी आधार क्रमांक> <10 अंकी पॅन कार्ड क्रमांक> या फॉर्मेटमध्ये एसएमएस करावं जर दोन्ही कार्ड जोडले असेल तर त्याची माहिती तुम्हाला मिळेल.
पॅन आणि आधार कार्ड कसं लिंक करणार?
- आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
- Quick Links या सेक्शवर क्लिक करा, त्यामध्ये Link Adhar पर्याय निवडा
- तुमचं पॅन आणि आधार क्रमांक नोंदवून Validate बटणवर क्लिक करा.
- आधार कार्डमध्ये असलेलं नाव, मोबाईल नंबर नोंदवा
- नंतर लिंक आधारवर क्लिक करा
- तुमच्या मोबाईल नंबर येणाऱ्या ओटीपीसह validate वप क्लिक करा.
हेही वाचा
- Link Pan To Aadhaar : आधार कार्डला पॅन लिंक करायला उरले केवळ ४ दिवस, नाहीतर बसेल फटका
- Raju Shetty: आधारला पॅन लिंकसाठी पैसे म्हणजे जनतेच्या पैशावर दरोडा, राजू शेट्टी आक्रमक