सातारा Foreign liquor On Dry Day: घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Ambedkar Jayanti) यांच्या जयंतीदिनी जिल्ह्यात 'ड्राय डे' (Dry Day) असताना दारूची चोरटी विक्री करणाऱ्या हॉटेलवर स्थानिक गुन्हे शाखेनं (एलसीबी) छापा टाकून 13 लाख 23 हजार रूपये किंमतीचा विदेशी मद्यसाठा आणि रोकड जप्त केलीय. याप्रकरणी हॉटेल मालकासह चौघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दारू केली जप्त : कराड-ढेबेवाडी मार्गावरील विंग (ता. कराड) गावच्या हद्दीत, हॉटेल रॉयल लँडस्केपमध्ये चोरटी दारू विक्री सुरू होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकाने छापा टाकून मध्यसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी आनंदा सोपान माने (रा. पापर्डे, ता. पाटण), अजित नागेश खबाले, अक्षय आप्पासो वाघमारे (दोघेही रा. विंग, ता कराड) आणि रणजित दिनकर काटे (रा. तडवळे, ता. शिराळा, जि. सांगली) यांच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
13 लाख 23 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त : हॉटेल मालकाच्या सांगण्यावरून 3 जण विदेशी दारुची विक्री करीत असताना, पोलिसांना आढळून आले. त्याठिकाणी रॉयल स्टॅग, रॉमॅनो वोडका, व्हाईट मिसचिफ, डीएसपी ब्लॅक, डॉक्टर ब्रँडी, ब्लेंडर्स प्राईड, मॅकडॉवेल नं. 1 अशा वेगवेगळ्या कंपनीचा 13 लाख 11 हजार 204 रुपये किंमतीचा विदेशी मद्यसाठा आणि 12 हजारांची रोकड, असा एकूण 13 लाख 23 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई: एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक सचिन भिलारी, उपनिरीक्षक तानाजी माने, सहाय्यक फौजदार सुधीर बनकर, हवालदार साबीर मुल्ला, अतिष घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, मंगेश महाडीक, सनी आवटे, शिवाजी भिसे, प्रविण कांबळे, मोहन नाचण, सचिन साळुंखे, राजु कांबळे, मनोज जाधव, लक्ष्मण जगधने, अरुण पाटील, प्रविण पवार, मोहसीन मोमीन, मयूर देशमुख, सचिन जगताप, नितीन येळवे, उत्पादन शुल्कच्या दुय्यम निरीक्षक डॉ. उमा पाटील, नितीन जाधव, जवान विनोद बनसोडे, राणी काळोखे यांनीही कारवाई केली.
हेही वाचा -
- छत्तीसगडमधील 776 कोटी रुपयांच्या दारु घोटाळ्यातील मुख्य आरोपीला बिहारमधून अटक - Chhattisgarh Liquor Scam
- अरविंद केजरीवालांना दिल्ली न्यायालयाचा मोठा झटका; अटकेविरोधातली याचिका फेटाळली - Verdict On Arvind Kejriwal Bail
- तुरुंगातून बाहेर पडताच संजय 'सिंह' यांची गर्जना, 'आप'चा संघर्ष करण्याचा निर्धार - MP Sanjay Singh granted bail