पुणे IAS Pooja Khedkar Case : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी यूपीएससीला बनावट मेडिकल सर्टिफिकेट दिल्याचं समोर आलं होतं. यानंतर त्यांचं राज्यातील प्रशिक्षण रद्द करण्यात आलं आणि पूजा खेडकर यांना पुन्हा मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात बोलावण्यात आलं होतं. मात्र, त्याआधी त्या नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच चौकशीची मुदत संपून देखील त्या मसुरी येथे गेल्या नाहीत. चौकशीसाठी मसुरीला न गेल्यानं आता पूजा खेडकर यांच्यावर कारवाई होणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
चौकशीला राहिल्या गैरहजर : गेल्या काही दिवसांपासून आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबतची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. अशातच पूजा खेडकर यांना चौकशीसाठी मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात बोलावण्यात आलं होतं. मात्र, पूजा खेडकर या चौकशीला देखील गेल्या नाहीत आणि त्यांच फोन देखील नॉट रीचेबल दाखवत आहे. तसेच पुणे पोलिसांकडून नोटीस देऊनही चौकशीला खेडकर या गैरहजर राहिल्या. पूजा खेडकर यांना मसुरीत ट्रेनिंग सेंटरने 23 जुलैपर्यंत मुदत दिली होती. या मुदतीपर्यंत त्या पोहचल्या नसल्यानं आता खेडकर यांच्यावर यूपीएससी आणि दिल्ली पोलीस कारवाई करण्याची शक्यता आहे.