पुणेHyperloop technology research : जगभरात हायपर लूपच्या संशोधनानं वेग घेतला आहे. विमानाच्याही पेक्षा जास्त वेगान प्रवास करण्यासाठी या तंत्राचा उपयोग केला जातो. व्यावहारिक पातळीवर हे तंत्रज्ञन आणण्यासाठी जगभर प्रयत्न होत आहेत. भारतातही याबाबत संशोधन सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतात हायपरलूपची बरीच चर्चा होत आहे. या हायपरलूपद्वारे एका शहरातून दुसऱ्या शहरात अवघ्या काही मिनिटांत जाता येतं. सध्या जगभरात 'हायपरलूप' तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. त्यातच पुण्यातील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या विद्यार्थ्यांनी हायपरलूपची निर्मिती केलीय.
विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter) तीन वेळा भारताचं प्रतिनिधित्व : विशेष म्हणजे 'एमआयटी विश्वशांती विद्यापीठा'च्या 'व्हेगापॉड हायपरलूप' टीमला तीन वेळा परदेशात जाऊन आंतरराष्ट्रीय 'हायपरलूप' स्पर्धेत प्रोटोटाइप सादर करण्याची संधी मिळाली आहे. थर्मल मॅनेजमेंट सिस्टीम लागू करण्यासोबतच स्टॅटिक इलेव्हेशन साध्य करण्याचं विद्यार्थ्यांचं उद्दिष्ट आहे. हे तंत्रज्ञान सानुकूल-बिल्ट 5-मीटर ट्रॅकवर देखील प्रदर्शित केलं जाईल. एमआयटी डब्ल्यूपीयूच्या 'व्हेगापॉड हायपरलूप' संघानं तीन वेळा भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. पहिल्या प्रोटोटाइप पॉडची एमआयटी विद्यापीठात स्वयंनिर्मित 50 मीटर ट्रॅकवर यशस्वी चाचणी केली. त्याची चाचणी ताशी 75 किलोमीटर वेगानं करण्यात आली. त्यामुळं ते 2021 मधील आशियातील सर्वांत वेगवान पॉड बनलं आहे.
विद्यार्थी संशोधनाला चालना : याबाबत विभाग प्रमुख डॉ. गणेश काकंडीकर म्हणाले, "टीम व्हेगापॉड'चं प्राथमिक उद्दिष्ट हायपरलूप तंत्रज्ञानात संशोधन करण्याचं आहे. या तंत्रज्ञानासाठी स्वदेशी उपकरणं वापरण्याचा प्रयत्न आहे. देशात हायपरलूप तंत्रज्ञानाच्या विकासाला गती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, भारतातील विद्यार्थ्यांनी चालवलेलं संशोधन सिंडिकेट, हायपरलूप तंत्रज्ञानाच्या स्केलेबिलिटी आणि विकासावर काम करण्यासाठी समर्पित आहे. स्केलेबल हायपरलूप प्रोटोटाइप तयार करण्याचं आमचं ध्येय आहे. आमच्या सिस्टममध्ये नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं" त्यांनी सांगितलं.
विदेशी मंचावर कौशल्य प्रदर्शित : "या व्यतिरिक्त आम्ही स्पेसएक्स हायपरलूप पॉड कॉम्पिटिशन, कॅनेडियन हायपरलूप वीक, युरोपियन हायपरलूप वीक यासह अनेक प्रतिष्ठित मंचांवर तांत्रिक कौशल्य प्रदर्शित केलं आहे. प्रोजेक्ट वज्र हा आमचा चालू वर्षाचा प्रोटोटाइप आहे. या वर्षी आमच्या अत्याधुनिक मॉड्यूलर मेकॅनिकल डिझाइन आणि मजबूत पॉवर इलेक्ट्रॉनिक्ससह एक व्यापक थर्मल व्यवस्थापन प्रणाली लागू करणे आमचं उदिष्ट आहे", असं डॉ. गणेश काकंडीकर म्हणाले.
'हे' वाचलंत का :
- पीक विमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास गय करणार नाही - धनंजय मुंडे - Dhananjay Munde
- विठुराया आणि वारकऱ्यांना एका बंधनात गुंफणारी 'तुळशीमाळ'; काय आहेत फायदे, घ्या जाणून - Ashadhi Wari 2024
- पुण्यात आढळला झिकाचा चौथा रुग्ण, महापालिकेचा आरोग्य विभाग लागला कामाला - Zika Virus In Pune