पिंपरी चिंचवड Inhuman act with wife: निर्भया प्रकरणाची कटू आठवण जागी होईल अशी घटना आपल्या पुण्याजवळ घडली आहे. पिंपरी चिंचवडमधील घटना आहे. पतीनं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर मोठ्या प्रमाणात शारीरिक अत्याचार केले. एवढंच नाही तर मानव जातीला काळीमा फासेल असं कृत्य त्यानं केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
चारित्र्यावर संशय घेत शहरात एका पतीने आपल्या पत्नीसोबत घृणास्पद कृत्य केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या गुप्तांगाच्या बाजूला छिद्र पाडून कुलूप बसवल्याचं आमनवीय कृत्य तिच्या पतीने केलं आहे. या घटनेमुळे पोलीस देखील चक्रावले आहेत. पीडित माहिलेच्या तक्रारीनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी 30 वर्षीय पती विरोधात गुन्हा दाखल केला. तसंच त्याला अटक केली आहे. तर 28 वर्षीय पीडित पत्नीला रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि महिला हे नेपाळ मधील असून पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात वास्तव्यास आहेत. महिलेचा आरोपी पती तिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. तसंच तिला मारहाण करत होता. 11 मे रोजी रात्री दहाच्या सुमारास आरोपी पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला हाताने मारहाण केली. तसंच ब्लेडने गुप्तांगावर वार करुन जखमी केलं. घरातील चाकू हातात घेऊन महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली.आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने महिलेचे हात पाय ओढणीने बांधले.