महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्नाक पुलासाठी 26 जानेवारीला मध्य रेल्वेवर किती तासांचा मेगा ब्लॉक? तर टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी विशेष गाड्या - CARNAC BRIDGE CENTRAL RAILWAY BLOCK

मुंबईतील मशीद बंदर रेल्वे परिसरातील 154 वर्षं जुन्या कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीसाठी मध्य रेल्वेकडून 25 ते 26 जानेवारीपर्यंत 6 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार, असं रेल्वेनं सांगितलंय.

Mega block on Central Railway
मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2025, 4:13 PM IST

मुंबई-मुंबईची रेल्वे लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाते. मुंबईकरांसाठी रेल्वे लोकल हे दळणवळणाचे मोठे साधन आहे. दररोज लाखो चाकरमानी या रेल्वे लोकलमधून प्रवास करतात. त्यामुळे काही तास उशिरा किंवा रेल्वे लोकल ठप्प झाली, तर मुंबईकरांचे जीवनमान थांबते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दरम्यान, याच मुंबई रेल्वे लोकलबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईतील मशीद रेल्वे परिसरातील 154 वर्षं जुना असलेल्या कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीसाठी मध्य रेल्वेकडून 25 जानेवारीपासून 26 जानेवारीपर्यंत 6 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, असं रेल्वेकडून सांगण्यात आलंय.

मेगा ब्लॉकचे कारण काय?

- मुंबईतील मशीद बंदर रेल्वे स्थानक परिसरातील पी. डिमेलो मार्गाला हा कर्नाक पूल जोडला गेलाय
- महापालिकेकडून कर्नाक पुलाची पुनर्बांधणीचे काम सुरू
- या पुलासाठी 550 मेट्रिक टन वजनाचा गर्डर 9.30 मीटरपर्यंत सरकवण्याची प्रक्रिया पूर्ण
- पण पुढचे काम रेल्वे हद्दीत असल्यामुळं मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार

मॅरेथॉनसाठी 2 विशेष गाड्या :कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीसाठी आणि या पुलाचे बांधकाम मजबुतीसाठी 25 जानेवारी मध्यरात्रीपासून ते 26 जानेवारी पहाटेपर्यंत सहा तासांचा विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलंय. या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तथापि मुंबईकरांनो जर 25 आणि 26 जानेवारीला जर रेल्वेने प्रवास करणार असला, तर रेल्वेचे वेळापत्रक वाचूनच घराबाहेर पडा, असं आवाहन मध्य रेल्वेने केलंय. दरम्यान, दुसरीकडे टाटा मॅरेथॉनसाठी दोन विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. मुंबईतील मॅरेथॉन स्पर्धा ही स्पर्धंकासाठी पर्वणी समजली जाते. मुंबईतील टाटा मॅरेथॉनकडे जगातील स्पर्धकांचे लक्ष लागलेले असते. टाटा मॅरेथॉन स्पर्धा यावर्षी 19 जानेवारी रोजी होत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने या मॅरेथॉनसाठी दोन विशेष गाड्या चालवण्यात येणार असल्याचं म्हटलंय.

हेही वाचा-

  1. "तुमचं आमच्यावरील सततचं निरीक्षण आणि देखरेख आम्हाला...", पती सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर करीनाची पोस्ट
  2. सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरण: आरोपीनं केली एक कोटींची मागणी, मोलकरणीच्या जबाबात उघड

ABOUT THE AUTHOR

...view details