रायगड Helicopter Crash In Mahad : शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना रायगड जिल्ह्यातील महाड इथं आज सकाळी सव्वा नऊ वाजता घडली. या घटनेत सुषमा अंधारे यांच्यासह पायलट सुरक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश :शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची महाड इथं कार्यकर्त्यांसह बैठक होती. तिथून त्यांना बारामती इथं पुढील कार्यक्रमासाठी जायचं होतं. त्यामुळे त्यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं होतं, मात्र हे हेलिकॉप्टर महाड इथं क्रॅश झालं. या घटनेत हेलिकॉप्टरचा पायलट आणि सुषमा अंधारे हे दोघंही सुरक्षित आहेत.
महाड इथं सुषमा अंधारे होत्या मुक्कामी :शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी रायगड इथं सबा होती. मात्र सगळे थकल्यानं सुषमा अंधारे यांनी महाड इथं मुक्काम केला होता. सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांना हेलिकॉप्टर घ्यायला येणार होतं. यावेळी हेलिकॉप्टर आलं नसल्यानं त्यांनी संयोजकांना फोनवर विचारणा केली. यावेळी हेलिकॉप्टर लवकरच येणार असल्याचं सुषमा अंधारे यांना सांगण्यात आलं. दरम्यान हेलिकॉप्टर आल्यानंतर त्यानं दोन घिरट्य़ा घातल्या. मात्र खाली येत असताना प्रचंड धुरळा उडून मोठा आवाज झाला. या आवाजात काय होतय याबाबत काहीच कळालं नाही, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.