ठाणे Heavy Rain in Thane :शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं मुरबाडहुन वाशिंदकडे जाणारा पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळं शहापूर तालुका तसंच मुरबाड तालुक्यातील सुमारे 18 गाव-पाड्यांचा संपर्क तुटला आहे. गावाकडून शहरांकडं जाणाऱ्या नागरिकांसह दूध, भाजी विक्रेते अडकून पडले आहेत.
काळू नदीच्या पाणी पातळीत वाढ (ETV BHARAT Reporter) काळू नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ : पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यामार्फत देण्यात आला आहे. वाढत्या पातळीवर ग्रामीण भागातील आपत्ती व्यवस्थापन लक्ष ठेवून आहे. ज्या ठिकाणी पुराचा जास्त धोका आहे, त्या ठिकाणच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार असल्याचं स्थानिक प्रशासनांकडून सांगण्यात आलं आहे. काळू नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून डोंगर भागातील घाट माथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळं पाणीपातळी आणखी वाढ होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार :गेल्या तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच ठाणे जिल्हाधिकारी कार्यलयाकडून स्थानिक यंत्रणांना भुस्खलन होऊ शकणाऱ्या गावांची, क्षेत्रांची पाहणी करून आराखडा तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसंच पाणी पातळीची माहिती जनतेला देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
अनेक गाव-पाड्यांचा संपर्क तुटला : पुराच्या पाण्यामुळं शिरगाव, चिखले, झापवाडी, मुरबाड तालुक्यातील गावांना फटका बसला आहे. शिवाय शहापूर तालुक्यातील शेरा, अंबरचा मड, मासवणे, बावघर, भय गावांचा संपर्क तुटला आहे. या गावाच्या आसपास असलेल्या अनेक गावपाड्यांसह टिटवाळा, वाशिंद, मुरबाड, शहापूर शहराचा संर्पक तुटला आहे.
हे वाचलंत का :
- ठाणेकरांना मुसळधार पावसाने झोडपले, 85.32 मिमी पावसाची नोंद
- ठाणे : जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद; सखल भागात शिरले पाणी