महाराष्ट्र

maharashtra

मुसळधार पावसामुळं पाटण तालुक्यात पडझडीचं सत्र सुरू, भिंत कोसळून दोन जनावरे मृत्युमुखी - Heavy Rain in Patan Satara

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 23, 2024, 9:55 PM IST

Heavy Rain in Patan Satara : सातारा जिल्ह्यात गेली तीन पावसाची संततधार आहे. पावसामुळं जनावरांच्या शेडची भिंत अंगावर कोसळून दोन जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. तसेच एक अंगणवाडी आणि घराची भिंतहीं ढासळली आहे.

Etv Bharat
सातारा पाऊस (ETV Bharat Reporter)

सातारा Heavy Rain in Patan Satara - पाटण तालुक्यातील वाघजाईवाडी गावात पावसामुळे जनावरांच्या शेडची भिंत कोसळली. त्याखाली सापडून म्हैस आणि रेडकाचा मृत्यू झाला. पावसामुळे शेडची भिंत खचल्याने ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

प्रशासनाने तातडीने पाठवली मदत : दुर्घटना घडलेल्या ठिकाणी प्रशासनाने त्वरित मदत पाठवून दिली. भिंतीचा मलबा जेसीबीने हटवला. तसेच मृत जनावरांना मलब्याखालून बाहेर काढून शवविच्छेदन केलं. त्यानंतर मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यात आली. प्रशासनानं या घटनेचा पंचनामा केला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत देण्याची त्वरीत कार्यवाही करण्यात येत असल्याचे पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाडे आणि तहसीलदार अनंत गुरव यांनी सांगितलं.

अंगणवाडीची इमारत, घराची भिंत पडली :आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे दानवली गावातील अंगणवाडीची इमारत पडली आहे. तसेच कारळे (ता. पाटण) येथील कोंडिबा बंडू साळुंखे यांच्या घराची भिंत ढासळली आहे. या दोन्ही घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही. देवघर गावातील विद्युत खांब पडल्याने पाच गावे अंधारात बुडाली होती. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तलावातून पोहत जावून भर पावसात खांब उभे केले. त्यामुळे दुर्गम भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला.

कोयनेच्या पाणीसाठ्यात दीड टीएमसीने वाढ :कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार आहे. परिणामी मंगळवारी दिवसभरात पाणीसाठ्यात दीड टीएमसीने वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा 66 टीएमसी झाला आहे. कोयनानगर येथे 61 मिलीमीटर, नवजा येथे 37 मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे 58 मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणात 49 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details