महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2024, 8:24 PM IST

Updated : May 28, 2024, 8:34 PM IST

ETV Bharat / state

मालगाडी घसरल्यानं पश्चिम रेल्वेला फटका, रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं - Goods Train Derailed At Palghar

Goods Train Derailed At Palghar : पालघर रेल्वे स्थानकावर मालगाडी रुळावरून घसरल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या या मालगाडीचे डबे पालघर रेल्वे स्थानकावर रुळावरून घसरले. त्यामुळं लोकल ट्रेनच्या वेळापत्रकावरही मोठा परिणाम झालाय आहे.

Goods Train Derailed At Palghar
पालघर येथे मालगाडी रुळावरून घसरली (ETV Bharat MH Desk)

मुंबईGoods Train Derailed At Palghar :पालघर रेल्वे स्थानकात सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मालवाहू गाडी रुळावरून घसरल्यानं मुंबई-सुरत मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

रेल्वे वाहतूकीला फटका : पालघर रेल्वे स्थानकात मालगाडीचं डबे रुळावरुन घसरल्यानं पश्चिम रेल्वेला त्याचा फटका बसला आहे. त्यामुळं पश्चिम रेल्वेची मुंबई दिशेनं येणारी वाहतूक विस्कळीत झाली असून वाहतूक सेवा उशिरानं सुरु आहे. फलाट क्रमांक दोनवरुन चारवर क्रॉसिंग करताना रेल्वेचे डबे रुळावरुन घसरले. त्यामुळे मुंबईच्या दिशेने होणाऱ्या वाहतुकीला त्याचा मोठा फटका बसलाय. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यानं बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. याघटनेमुळे पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे.


रेल्वेचे अधिकारी, तंत्रज्ञ घटनास्थळी दाखल :मालगाडी रुळावरून घसल्यामुळं मुंबई दिशेने जाणारी रेल्वेची वाहतूक सध्या ठप्प झाली आहे. रुळावरुन घसरलेली मालगाडी दूर करण्यासाठी रेल्वेचे अधिकारी, तंत्रज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या मुंबईहून गुजरातच्या दिशेनं जाणारी वाहतूक काही प्रमाणात सुरु आहे. डबे घसरल्यानं दोन, तीन, चार क्रमांकावरील सेवा पूर्णतः ठप्प झाली आहे. ही मालगाडी स्टील कॉईल वाहून नेत होती. या घटनेत पालघर रेल्वे स्थानकातील रेल्वेच्या विद्युत सेवेवर देखील प्रतिकूल परिणाम झाला आहे. यामुळे पुढील काही तास या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वीजवाहिनीतही झाला बिघाड : अपघातग्रस्त मालगाडी स्टील कॉइल घेऊन मुंबईच्या दिशेनं जात होती. पालघर रेल्वे स्थानकाजवळ या मालगाडीचे शेवटचे सहा डबे रुळावरून घसरले. त्यात गार्डच्या डब्याचाही समावेश आहे. अपघातामुळं या मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. मालगाडीच्या डब्यातील जड कॉइल लगतच्या लूप लाईनवर (स्लाइडिंग ट्रॅक) पसरल्यानं रेल्वे मार्ग क्रमांक दोन, तीन आणि चारवरील सेवा बंद करण्यात आली आहे. त्याचवेळी या अपघातामुळं वरच्या दिशेला असलेल्या वीजवाहिनीत बिघाड झाला आहे. त्यामुळं या मार्गावरील वाहतूक पुढील काही तास बंद राहण्याची शक्यता आहे. मात्र, मुंबईहून गुजरातकडं जाणारी वाहतूक संथ गतीनं सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

हे वाचलंत का :

  1. Goods Train Derailed: इगतपुरीवरून कसाराकडे येणारी मालगाडी रुळावरून घसरली; इंजिन आणि बोगी रुळावर आणण्यात यश
  2. Odisha Goods Train Derailed : सोसाट्याच्या वाऱ्याने ओडिशात मालगाडी घसरली रुळावरून, 6 मजुरांचा मृत्यू
  3. Odisha Train Accident: ओडिशामध्ये पुन्हा मालगाडी रुळावरून घसरली, सुदैवाने जीवितहानी नाही!
Last Updated : May 28, 2024, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details